

मुंबई : टीईटीसह (TET Exam Scam) राज्यातील विविध परिक्षांदरम्यान होत असलेल्या सततच्या घोटाळ्यांमुळे ठाकरे सरकारची (Thackeray Government) डोकेदुखी वाढली आहे. टीईटी घोटाळ्यात तर एका आयएएस अधिकाऱ्याचा हात होता. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचाच यामध्ये मोठा सहभाग होता. त्यामुळे आता ठाकरे सरकार पोलीस भरतीबाबत ताकही फुंकून पिणार आहे. या भरतीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
दिलीप वळसे-पाटील यांनी मागील आठवड्यात पोलीस भरतीबाबत महत्वाची घोषणा केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७२०० पोलिसांची (police) भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार असल्याचे वळसे-पाटलांनी सांगितले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली आलेली ५७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती दिलीप वळसे यांनी दिली होती. (Maharashtra Police Bharti 2022 News)
त्यानंतर आता या दुसऱ्या टप्प्यातील भरतीबाबत मोठी बातमी हाती आली आहे. या भरतीसाठी गृहखात्याकडून कोणत्याही खाजगी एजन्सीची नेमणूक केली जाणार नाही. गृह विभागाकडूनचं संपूर्ण प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांना मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. गृह विभागाच्या या निर्णयामुळे परिक्षेतील गोंधळ थांबणार का, हे लवकरच समजेल. (Dilip Walse Patil News)
दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात सुशील खोडवेकर (वय ४3) (Sushsil Khodwekar) या आयएएस अधिकाऱ्याला अटक झाली आहे. हा घोटाळा होते वेळी खोडवेकर शिक्षण खात्यातील आस्थापना विभागात उपसचिव होता. सध्या त्यांची नियुक्ती कृषी खात्यात आहे. या साऱ्या प्रकरणाच्या मूळापर्यंत पुणे पोलिस पोहोचत असून यात मोठा मासा त्यांना सापडला आहे. सॉफ्टवेअर कंपनी, संचालक दर्जाचे अधिकारी आणि त्यात खोडवेकरची साथ असे हे सारे प्रकरण घडले आहे. सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी TET परीक्षेत बेकायदा पास करण्याचा `पराक्रम` जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख, शिक्षण संचालक तुकाराम सुपे आणि खोडवेकर यांनी केला.
या प्रकरणात सुपे, सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह इतर काही शासकीय नोकरदार तसेच एजंट आणि साखळीतील इतरांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीत खोडवेकर यांचा देखील या गैरव्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले.
तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल माहिती घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी जी. ए. सवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यास मदत केली. सुपे आणि देशमुख यांनी मनोज डोंगरे मार्फत खोडवेकर यांना लाखो रुपये दिले आहेत. सुपे यांचे खात्यांतर्गत गैरवर्तन असतानाही त्यास त्यातून बेकसूर ठरविण्यात खोडवेकर यांनी भूमिका बजावली, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.