Ravindra Waikar News: ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार वायकरांच्या अडचणी वाढणार; सोमय्यांच्या तक्रारीनंतर चौकशी सुरु

Crime News : मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी 500 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
Ravindra Waikar News:
Ravindra Waikar News: Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वायकर यांनी महाकाली गुंफा प्रकरणात 500 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्यांनी करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ठाकरे गटातील नेत्यांवरील आरोपसत्र सुरूच आहे. मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी घोटाळा केला आहे. 500 कोटींचा हा घोटाळा आहे. महाकाली गुंफेसाठी 500 कोटी बिल्डरला दिले, असा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी केला आहे.

Ravindra Waikar News:
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना आणखी एक झटका; युवासेनाचा मोठा पदाधिकारी शिंदे गटात

कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशीला आता सुरुवात केली आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्या तक्रारीवरून ही चौकशी केली जात आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी असा इशारा दिला होता.

वायकर यानी मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रीडांगण व गार्डनसाठी असलेल्या जागेवर वायकर यांनी अनधिकृत कब्जा केला असून तिथे दोन लाख वर्ग फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्याची सुरुवात केली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. या हॉटेलची किंमत 500 कोटी इतकी होत असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

Ravindra Waikar News:
K.C. Venugopal at Matoshri : उद्धव ठाकरेंच्या पाठिशी काँग्रेस खंबीरपणे उभी; वेणुगोपाल यांनी दिला शब्द

काय आहे सोमय्यांचा आरोप ?

महाकाली गुंफेमध्ये रवींद्र वायकर यांनी घोटाळा केला आहे. 500 कोटींचा हा घोटाळा आहे. महाकाली गुंफेसाठी 500 कोटी बिल्डरला दिले आणि या बिल्डरांमध्ये अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांचा समावेश आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com