Uday Samant News : ठाकरे गटाचे १३ आमदार शिवसेनेच्या संपर्कात; उदय सामंतांचा मोठा दावा

Maharashtra CM News : काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले
Uday Samant
Uday SamantSarkarnama

Maharashtra Politics : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलावरून चर्चांना जोर आला आहे. दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तत्पुर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोध पक्षनेते अजित पवार यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. दरम्यान, बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून राज्याचे राजकारण तापले. त्यातच मुख्यमंत्री अचनाकच आपल्या गावी निघून गेल्याने चर्चांना हवा मिळत आहे. मात्र अशा चर्चांना काही अर्थ नसतो, असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे.

Uday Samant
Jayant Patil News: राष्ट्रवादीत भाकरी फिरणार? बॅनर अजितदादांचे : पण खासदार म्हणतात जयंत पाटीलच मुख्यमंत्री...

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना काही अर्थ नसून २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसेच २०२४ ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार आहे. तसेच त्यात यश मिळवून आम्हीच सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यानंतर आज उदय सामंत (Uday Samant) यांनीही सध्या मुख्यमंत्री बदल्याच्या सुरू असलेल्या चर्चांना काहीच अर्थ नाही, असेही सामंत यांनी सांगितले. तसेच ठाकरे गटाचे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसचे पक्षाचा एक बडे नेते मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना महाबळेश्वर येथे भेटल्याचा दावाही सामंत यांनी केला.

Uday Samant
DR.Bhagwat Karad News : `प्रधानमंत्री स्वनिधी` तून आता फेरीवाल्यांनाही १० ते ५० हजारापर्यंत कर्ज ..

उदय सामंत म्हणाले, " मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रोजच होता. आता उद्धव ठाकरे गटाचे उरलेले १३ आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २० आमादारही शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात आहे, अशीही चर्चा आहे. काँग्रेसचे बडे नेते शिंदेसाहेबांना भेटल्याचीही चर्चा आहे. चर्चा भरपूर होतात. पण त्या सत्यात उतरले पाहिजे."

Uday Samant
Raut - Malik Meet: ''कोश्यारींना गांभीर्यानं घेता,त्यांचे बेकायदेशीर निर्णय..?''; मलिकांच्या भेटीनंतर राऊतांचं मोठं विधान

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे नाव घेत राज्यात लवकरच मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा केला. मिटकरी म्हणाले, "अजितदादांसारख अभ्यासू व तोलामोलाचा माणूस सध्यातरी राज्यात नाही. ही गोष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मान्य केली आहे. अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल. वेट अँड वॉच."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com