महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.
विधानमंडळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
बैस यांनी विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात भाषणं केले.
राज्यपाल बैस यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
यावेळी त्यांनी सरकारने आतापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य करत, त्या निर्णयाचे कौतुक केले.