Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकरांना वायकरांच्या विजयावर संशय; खळबळजनक आरोपांमुळे मुख्यमंत्री टेन्शनमध्ये?

Gajanan Kirtikar statement on the results of North-West Mumbai Lok Sabha Constituency : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढतीवर आणि निकालावर गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानाने शिवेसना एकनाथ शिंदे गटात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या कृतीवर देखील कीर्तिकर यांनी संशय व्यक्त केला.
Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikarsarkarnama
Published on
Updated on

North-West Mumbai Lok Sabha Constituency : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे गुऱ्हाळ संपताना दिसत नसून, ते टेन्शन वाढताना दिसत आहे. रवींद्र वायकर विजयी झाले तर, अमोल कीर्तिकर पराभूत झाले. शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात या निकालावरून धुसफूस सुरू आहे.

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढवणारे विधान त्यांच्या गटातील नेते गजानन कीर्तिकर यांनी केले आहे. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त करत जिल्हाधिकारी यांची कृती कुठेतरी संशयास्पद असल्याचे म्हटले. यामुळे शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई (Mumbai) लोकसभा मतदारसंघातील शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढतीवर आणि त्यातील निकालावर गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यात त्यांनी निकालावर संशय व्यक्त केला. मतमोजणीत काही गोष्टी संशयास्पद दिसत आहेत. उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी कशी आहे? त्या संशयास्पद व्यक्ती आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडून निकालात काहीतरी संशायस्पद कृती झाली आहे. त्यांना त्याची न्यायालयात बाजू मांडावी लागणार आहे. सफाई द्यावी लागणार आहे, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.

Gajanan Kirtikar
ShivSena UBT : नागपूर पूर्व-दक्षिणसाठी रंगला ठाकरेंच्या गटातच सामना !

मुंबईतील निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले आहे. उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी म्हणून आरोप नसलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्याची शिफारस आहे. तरी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जिल्हाधिकारी यांची मोठी चूक ठरली.

आता जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाला सफाई द्यावी लागणार आहे. यातच न्यायालयाचा निकाल आल्यावर तो स्वीकारावाच लागतो आणि तो आम्ही स्वीकारू, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे. गजानन कीर्तिकर यांनी अशी भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात खळबळ उडाली आहे. गजानन कीर्तिकर नेमके कोण्याच्या बाजूने? अशा शिंदे गटात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Gajanan Kirtikar
Sujay Vikhe Patil : भाजपचे पराभूत उमेदवार विखेंना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लढत न्यायालयाच्या दिशेनं?

ठाकरे शिवसेनेसह शिशिर शिंदेंना फटकारले

शिवेसना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्याचे सांगून गजानन कीर्तिकर यांनी मी विधानसभा लढणार नाही असे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरीने मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात असेल, असेही त्यांनी सांगितले. मी 58 वर्षांपासून शिवसेनेत आहे. काँग्रेसबरोबर शिवसेना गेली, तेव्हाच बाळासाहेबांचे विचार सोडल्याचे सांगितले. त्यांनी आता नैतिकतेच्या गप्पा मारू नये, असेही गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर सुनावले.

गजानन कीर्तिकर यांनी शिशिर शिंदे यांना देखील फटकारले. शिशिर शिंदे हा दलबदलू माणूस आहे. शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून शिवसेनेत, त्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आलेल्या व्यक्तीने मला निष्ठेच्या आणि शिष्टेच्या धडे काय पाजणार, अशा शब्दात गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com