BJP And Shivsena Meeting : भाजप-शिंदे गटातील स्थानिक वादावर 'हा' तोडगा; समन्वय समितीची आज बैठक

BJP And Shivsena Local Dispute : महापालिकेसह लोकसभा, विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BMC Election Seat Distribution Between BJP And Shivsena : आगामी निवडणुकीपूर्वीच काही ठिकाणी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांतील वाद समोर आले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आणि महापालिका आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आज दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. (Latest Political News)

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकसंदर्भात भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची आज मंगळवारी (ता. २७) समन्वय समितीची बैठक होणार आहे. ही बैठक शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुका जागावाटप आणि कशाप्रकारे समन्वय राखायचा यावर प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे तर भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वरिष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nitesh Karale News : भाजपच नाही, तर आजवर एकही सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आले नाही !

पावसाळ्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये राज्यातील प्रमुख महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. कोरोना काळामध्ये या महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतरही निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या. आता मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या अनेक महापालिका आणि नगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लगेच होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत जागावाटप कशा प्रकारे असणार, या संदर्भात आज प्राथमिक चर्चा होणार आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Congress Criticize to KCR : तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सिंघम नव्हे ते तर जयकांत शिक्रे; काँग्रेस प्रवक्त्याची बोचरी टीका!

आज होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत दोन्हीही पक्षांमध्ये समन्वय संदर्भात चर्चा होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजप शिवसेना नेत्यांनी संदर्भात करण्यात येणारे वक्तव्य आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यात मध्ये कशाप्रकारे समन्वय ठेवण्यात येईल यावर देखील चर्चा होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे शिवसेना आणि भाजप मधील कार्यकर्त्यांमध्ये वाद पहायला मिळाला होता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी देखील दर्शवली होती.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com