Shivsena News : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाची वर्षपूर्ती : निवडणुकीनंतर शिंदे नॉट रिचेबल झाले अन् राज्याच्या राजकारणात भूकंप झाला!

Cm Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांना सोबत घेत बंड केले.
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde, Uddhav Thackeray News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांना सोबत घेत बंड केले. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झाले. शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बंड २० जून २०२२ च्या रात्री घडले. नंतर याच बंडामुळे ठाकरेंच्या हातातून शिवसेना गेली.

20 जून २०२२ ला विधान परिषदेची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पाचवा उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे शिवसेनेमध्ये मोठे बंड घडत होते. ही निवडणूक संपल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 16 आमदारांसह नॉट रिचेबल झाले. त्यानंतर त्यांनी रातोरात सुरतला गाठले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Vivek Kolhe News : 'गणेश'च्या निवडणुकीत किंगमेकर ठरले विवेक कोल्हे; थोरातांच्या मदतीने विखे पाटलांचा गड केला खालसा!

त्यांच्या बंडाची कुणकुण लागताच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पुढील 10 दिवस राज्यात राजकीय नाट्य रंगले. या दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचा एक-एक आमदार शिंदे यांना जाऊन मिळाला. शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आणि 10 अपक्ष आमदारांनी बंड केले.

हे सर्व आमदार प्रथम सुरतला आणि त्यानंतर आसामधील गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 29 जून रोजी राजीनामा दिला. 30 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आणि उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर सुरु झाला तो सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्ष.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Jayant Patil News : राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेतून मोठी माहिती समोर; पक्षाला अनेक मतदारसंघात...

या घटनाक्रमानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात या प्रकरणी 5 न्यायामूर्तींचे घटनापीठ स्थापन झाले. जवळपास नऊ महिने या प्रकरणावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. यावर विधानसभा अध्यक्षांनी अजून पर्यंत निर्णय घेतला नाही. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हा पक्ष व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाच्या स्वाधीन केले.

यानंतर शिंदे गटात ठाकरेंचे १३ खासदार आणि अनेक पदाधिकारी गेले. शिंदेंच्या गटात इनकमिंग व ठाकरेंच्या गटात आऊटगोईंग सुरू आहे. ठाकरेंचे विश्वासू सहकारी खासदार संजय राऊत यांना ईडीच्या प्रकरणात १०० दिवस तुरुंगात रहावे लागले. आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com