'एकवेळ सुर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामती पवारांचीच!'

Jayant Patil : कोण कोणाकोणाला लक्ष्य करतोय, हे तुमच्याही लक्षात येईल,” असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपने बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. याबाबतची रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा बारामती दौऱ्याची चर्चा होत होती. आगामी काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांचाही बारामती दौरा होणार आहे. भाजपच्या या सर्व घडीमोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला जोरदाप प्रत्युत्तर दिले आहे. “बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती आहे, त्यामुळे कोणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारांना सोडणार नाही, एवढं ते घट्ट नातं आहे,”असं जयंत पाटील म्हणाले आहेत. (NCP Jayant Patil Attack On BJP)

जयंत पाटील पुढे म्हणाले, एखाद्याच्या अश्वमेध रोखल्यावर जो काही त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपला होत आहे, असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.“बारामतीत कोणता उमेदवार द्यायचा हे भाजपा ठरवेल. भाजपाने सध्या बारामती आणि आमच्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. आम्ही सर्वात मोठ्या लोकांना लक्ष्य केलं आहे, असं वातावरण तयार करायचं अशी भाजपाची पद्धत आहे. मात्र थोड्या दिवसात आमचीही योजना मांडू. त्यावेळी कोण कोणाकोणाला लक्ष्य करतोय, हे तुमच्याही लक्षात येईल,” असा सावध इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

Jayant Patil
पेंग्विनसेना मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहतोय - उपाध्ये

“सत्ता घेतली आहे, आता सत्तेत राहून लोकांची कामं करायची सोडून ते अशा तयारीला लागले आहेत. याचाच अर्थ असा की, भाजपाला आपली लोकप्रियता घटायला लागली असल्याचं लक्षात आलं आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा ते अशा गोष्टी करतात,” असा जोरदार समाचारही जयंत पाटील यांनी केला.

Jayant Patil
शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचाच हक्क : संपत्तीला वारस असतो, पक्षाला नाही - मुनगंटीवार

“भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाने यांना मागील विधानसभेचे तिकीट नाकारले गेले होते. आता ते का नाकारले गेले, याची मला चर्चा करायची नाही. पण बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पद्धतीने भाष्य करणं, त्यांना शोभत नाही,” असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com