Aurangabad High Court News
Aurangabad High Court NewsSarkarnama

Supreme Court on Maharashtra Politics: मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली

Maharashtra Politics : गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना न्यायालयाने स्थगिती दिली होती.
Published on

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयातून राज्याच्या राजकारणासाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवर लावण्यात आलेली स्थगिती उठण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठात आज (११ जुलै) या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

गेल्या वर्षी राज्यातील सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यपालांकडे नवी यादीही पाठवली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जुनी यादी रद्द करून नव्या यादीला मंजूर देण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली आणि न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या याचिकेवरील स्थगिती उठवली आहे.

Aurangabad High Court News
Supreme Court on Maharashtra Politics: मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली

महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्यपाल नियुक्त आमदरांची 12 जणांची नावे पाठवली होती. पण कोश्यारी यांनी या आमदारांना मंजुरी दिली नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती स्थगिती उद्या उठणार की कायम राहणार, याची उत्सुकता राज्यातील नेतेमंडळींपासून सर्वसामान्य नागरिकांना लागली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या वेळी सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांची मंजुरीचा होता. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या १२ जणांच्या नावाला कोश्यारी यांनी शेवटपर्यंत मंजुरीच दिली नव्हती. तसेच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत भाषेत पत्रही लिहिले होते. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीने पाठविलेल्या १२ आमदारांच्या नावाला मंजुरी मिळालीच नाही.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com