Rohit Pawar News: भाजपविरोधी भूमिका घेतल्याने वाटलं पोलीस मला घ्यायला आले... ; रोहित पवार असं का म्हणाले?

Rohit Pawar On Kirit Somaiya: किरीट सोमय्या आणि माझा मुक्काम हा एकाच ठिकाणी होता.
Rohit Pawar - Kirit Somaiya
Rohit Pawar - Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि शरद पवार गट समर्थक आमदार रोहित पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते छत्रपती संभाजीनगर शहरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, शहरात ते ज्या ठिकाणी वास्तव्यासाठी थांबले होते, त्याच ठिकाणी भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. यामुळे सोमय्यांच्या पोलीस संरक्षणाचा लवाजमा पाहून रोहित पवार संभ्रमात पडले. (Latest Marathi News)

Rohit Pawar - Kirit Somaiya
NCP Leader Threat Extortion : बार्शीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखास धमकी देत मागितली खंडणी

रोहित पवार म्हणाले, 'रात्री किरीट सोमय्या आणि माझा मुक्काम हा एकाच ठिकाणी होता. ज्या ठिकाणी मी विश्रांतीला होतो, त्याच ठिकाणी मोठ्या संख्येत पोलीस आले. मला वाटलं मी भाजप विरोधी भूमिका घेतली म्हणून मलाच घ्यायला आलेत की काय? पण, नंतर कळलं की, इथे माजी खासदार सोमय्या देखील आहेत. सोमय्यांच्या सुरक्षेवर इतका खर्च का होत आहे, ते कळत नाही."

Rohit Pawar - Kirit Somaiya
Hasan Mushrif On Sharad Pawar : शरद पवार तुमच्या सोबत कधी येणार; मुश्रीफ म्हणाले...

पवार पुढे म्हणाले, "काल विद्यापीठात भेट दिली. तसा आज विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंना भेटण्यासाठी आलो आहे. गेल्या काही वर्षांत युवांबद्दल कोणी काही बोलत नाही, युवांमध्ये खूपच खदखद आहे. राज्यात अनेक उद्योग येत होते, पण आता उद्योग येत नाहीत. शिक्षण- रोजगार हा मुद्दा आहे. युवांचं मत या सरकारविरोधात आहे. युवांचा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना जेवायला पैसे नाहीत, म्हणून मुलं एक वेळ नाष्ट्यावर काढतात, अशी वेदनाही रोहित पवारांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com