Mumbai Congress President: भाई जगतापांना अचानक हटवण्याचं 'ही' आहेत कारणं

Mumbai Politics| माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Varsha Gaikwad and 
Bhai Jagtap
Varsha Gaikwad and Bhai JagtapSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Congress President : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरून हटवत त्यांच्या जागी आता माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.यामागे काही कारणेही सांगितली जात आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. चौकशी समितीनेही या पराभवाचा ठपका भाई जगताप यांच्यावर ठेवल्या. यासोबतच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘एकाला चलो रे’ ही भूमिका जगताप यांनी ठेवली होती. तीच त्यांना महागात पडली. भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली होती. तसेच, काँग्रेसने महाविकास आघाडीतून लढण्यापेक्षा स्वबळावर लढावे अशी त्यांची सुरुवातीपासून ठाम भूमिका होती. पण मुंबईत काँग्रेसची (Congress) ताकद वाढत नसल्याचे पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आले.

Varsha Gaikwad and 
Bhai Jagtap
Eknath Shinde Kashmir Tour : मुख्यमंत्री शिंदेंचे चक्कं काश्मीरमध्ये स्वागताचे फलक; स्थानिक समर्थकांचा प्रेमाचा वर्षाव....

आधीच विधान परिषद निवडणुकीतील चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचे खापर जगताप यांच्यावर फोडण्यात आले होते. पण दुसरीकडे पक्षाची अधिकची मते मिळवून भाई जगताप स्वत: विजयी झाले. पण पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे हंडोरे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. हंडोरे यांचा पराभव पक्षाने गांभीर्याने घेतला होता. रमेश चेन्नीथाला यांच्या नेतृत्त्वात स्थापन झालेल्या चौकशी समितीने हंडोरे यांच्या पराभवाला भाई जगताप यांना जबाबदार धरले. (Maharashtra Politics)

अशातच गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष नेतृत्वात बदल करण्याच्या चर्चा सुरु होत्या. जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्ष संघटना मरगळ आली असल्याचे बोलले जात होते.जगताप यांना हटवल्यानंतर मराठी चेहराच अध्यक्षपदी नेमण्याच्या या दृष्टीने चाचपणी करण्यात आली.वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. (Congress Politics)

खास बाब म्हणजे वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते.तर त्यांच्या आधी मुरली देवरा आणि मिलिंद देवरा या पिता-पुत्रानेही मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड ही मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारी ही दुसरी जोडी आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com