Ajit Pawar News : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच राज्य सरकारचा धनगर समाजासाठी 'हा' मोठा निर्णय

Maharashtra Politics : सद्य:स्थितीत धनगर समाजातील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना शहरांमधील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो...
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे- फडणवीस- पवार यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचवेळी आता मराठा समाजासह ओबीसी, धनगर समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन आक्रमक झाले आहे. याचदरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर समाजासाठी महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे.

राज्य सरकारची इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्या आणि प्रलंबित विषयांबाबतची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिली.

Ajit Pawar
Maratha Reservation News: मराठा आरक्षणावर शिंदे-फडणवीस-पवार खरंच गंभीर आहेत का? Video Viral; नेमकं काय घडलं...

अजित पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय...?

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्य सरकारच्यावतीने नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देश दिले आहेत.

याबरोबरच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन तसंच अन्य शैक्षणिक सवलती देणारी आधार योजना लागू करणं, ओबीसी विद्यार्थ्यांच्या राज्यातील ७२ वसतिगृहांसाठी साहित्य खरेदी आणि वित्त व विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या अटी व शर्थी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील बैठकीत दिल्याची माहिती त्यांनी दिली.

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील महानगरं, शहरं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेता आलं पाहिजे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाची 'स्वयंम' योजना आणि सामाजिक न्याय विभागाची 'स्वाधार' योजनेच्या धर्तीवर 'आधार' योजना राबवण्यात यावी. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात भत्त्याची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात येईल. या योजनेसाठी विद्यार्थी संख्या निश्चित करून विभागानं सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.(Reservation News)

सद्य:स्थितीत धनगर(Dhangar) समाजातील साडेपाच हजार विद्यार्थ्यांना शहरांमधील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. मात्र या योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या पाहता त्यात वाढ करण्यात येईल. इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाची योजना इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येईल.

Ajit Pawar
Maharashtra politics : 'भाऊंनी' घातली 'दाजीं' ना भगवी टोपी ! भाजप-राष्ट्रवादीची मैत्री पक्की

...अशा विद्यार्थ्यांचा यासाठी प्राधान्यानं विचार करावा!

यासंदर्भात नामांकित शाळेची निवड, विद्यार्थी निवड करण्याबाबतचे निकष, धोरण आखण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत प्रवेश मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांचा यासाठी प्राधान्यानं विचार करावा, अशी सूचना केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar
Atul Londhe News : '' भाजप सरकारला मराठाच नाही, तर धनगर समाजालाही...'', मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हिडिओवर काँग्रेसचा आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com