Atul Londhe News : '' भाजप सरकारला मराठाच नाही, तर धनगर समाजालाही...'', मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हिडिओवर काँग्रेसचा आरोप

Congress On Maratha Reservation News : शिंदे-फडणवीस-पवारांचे संभाषण गंभीर असून त्यातून त्यांना आरक्षणाचे काहीही देणेघेणे नाही...
Atul Londhe
Atul LondheSarkarnama

Mumbai : भाजप हा आरक्षणविरोधी आहे, हे सर्वश्रुतच असून सध्याच्या राज्यातील भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. कारण ते हे सत्तापिपासू असून सत्तेसाठी वाट्टेल ते शब्द देऊन दिशाभूल करतात,असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

तसेच आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यामागे काय दडले आहे हे लक्षात येते, असे सूचक विधान त्यांनी केले. शिंदे-फडणवीस-पवारांचे संभाषण गंभीर असून त्यातून त्यांना आरक्षणाचे काहीही देणेघेणे नाही,हे लक्षात येत आहे,असेही ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील परवाच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ बुधवारी (ता.१३) व्हायरल झाला. त्यावर तो एडिट करून खोडसाळपणा केला असल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी लगेच केला. तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही.भाजप सरकारला आरक्षण हे द्यायचेच नाही,असा दावा कॉंग्रेसने त्या व्हिडीओवर मुख्यमंत्र्याच्या स्पष्टीकरणानंतरही केला आहे.

Atul Londhe
Buldana Maratha Protest : धक्कादायक ! मराठा आरक्षणासाठी तरुणाचे टोकाचे पाऊल; गॅलरीतून उडीचा प्रयत्न

अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले, एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करून सत्तेसाठी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बदनाम करायचे, हे त्या व्हिडिओवरून स्पष्टपणे लक्षात येते. मुख्यमंत्रीच, जर त्यात तसं म्हणत असतील, तर त्यात काय दडले आहे,हे लक्षात येते,असे लोंढे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे(Manoj Jarange) यांचा जीव घ्यायचा आहे काय,असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते .त्यात तथ्य असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. तसेच शिंदे, पवार व फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक केली आहे,हे ही त्यातून स्पष्ट होत आहे,असेही ते म्हणाले.

सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो, एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो, आरक्षण देण्याची धमक फक्त फडणवीसमध्येच आहे अशा वल्गना फडणवीसांनी केल्या होत्या त्याचे काय झाले हे आपण पहात आहोतच,असा टोला त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणप्रश्नी सरकार सकारात्मक आहे असे मुख्यमंत्री वारंवार म्हणतात. पण, प्रत्यक्षात सरकारमधील कोणीही त्यापश्नी गंभीर नाही. त्यामुळे जनतेने आता,तरी सत्तापिपासूंचा कावा ओळखून वेळीच सावध व्हावे, असा हल्लाबोलही लोंढे यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Atul Londhe
Chhatrapati Sugar Factory : 'छत्रपती'च्या निवडणुकीचा बिगुल केव्हा वाजणार ? विद्यमान संचालक मंडळाला सव्वातीन वर्षांच्या मुदतवाढीचा 'जॅकपॉट'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com