Thackeray- BJP Politics: हा तर मोदी सरकारचा भ्याडपणा; ठाकरेंचा थेट पंतप्रधानांवर हल्लाबोल

rahul gandhi disqualification | मोदीकाल हा अमृतकाल नसून हुकूमशाहीचा आतंककाल वाटावा अशी स्थिती आहे.
Rahu Gandhi| Narendra Modi
Rahu Gandhi| Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Thackeray- BJP Politics: पंतप्रधानांनी ज्या ‘अमृतकाला’चा उल्लेख केला त्या अमृतकालात रोज विषाचे फवारे उडत आहेत. न्यायालये, स्वातंत्र्य व लोकशाहीची मानहानी सुरू आहे. मोदीकाल हा अमृतकाल नसून हुकूमशाहीचा आतंककाल वाटावा अशी स्थिती आहे. अशी टिका दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी खासदारा राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लोकसभेच्या या निर्णयाविरोधात आज सामनातून ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल यांनी दाखविल्यामुळे घाबरलेल्या सत्ताधाऱयांनी कायदेशीर कारवाईची ही ‘मर्दुमकी’ दाखवली आहे. ‘सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका प्रचार सभेत विचारला होता.

Rahu Gandhi| Narendra Modi
OBC Agitation News : जातिनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव २८ मार्चला दिल्लीत धडकणार...

इस्रायल देशात तेच सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कोणताही निकाल बदलण्याचे अधिकार संसदेला बहाल करण्याचा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा मानस आहे. आपल्या मोदींचाही तोच मानस आहे व त्यांची पावले त्याच दिशेत पडत आहेत. सुरत न्यायालयाचा निकाल हा 'नेतान्याहू पॅटर्न' लागू करण्याची सुरुवात आहे. कायद्यातील तरतुदीचा आधार घेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय या पॅटर्ननुसारच असल्याची टिका ठाकरे गटाने केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सध्याचा काळ हा ‘अमृतकाल’ असल्याचे सांगितले, पण या अमृतकालात चोरांना चोर म्हटले म्हणून शिक्षा ठोठावली गेली आणि चोरांना सजा मिळाली नाही. ‘गौतम अदानी व मोदी भाई भाई, देश लुट कर खाई मलई’ अशा घोषणा सध्या संसदेत दणाणत आहेत व दोन आठवडय़ांपासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱया अदानीवर कारवाईचे नाव नाही, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली आहे. अशा शब्दात ठाकरे गटाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com