मुंबई लोकलवर बॉम्ब हल्ल्याची धमकी, सुरक्षेत केली वाढ

लोकल स्थानकावर जीआरपी आणि मुंबई पोलिसांची (Mumbai Police) टीम तैनात करण्यात आली आहे.
Mumbai Local
Mumbai LocalSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई लोकलवर (Mumbai Local) बॉम्ब हल्ला (Bomb Attack) करण्यात येणार असल्याच्या एका निनावी फोनवर दिलेल्या धमकीमुळे काल (ता.13 नोव्हेंबर) मोठी खळबळ उडाली होती. मात्र, ही माहिती मिळताच, रेल्वे पोलीसांची टीम ही बॉम्ब स्कॉड व डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली व सर्च ऑपरेशन करण्यात आले. याबाबत सर्च ऑपरेशन सुरु असून यामध्ये पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही. मात्र, मुंबई लोकलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Mumbai Local
औरंगजेबी प्रवृत्तीला वेळीच ठेचा

शनिवारी (ता.13 नोव्हेंबर) संध्याकाळी 6:30 सुमारास वांद्रे रेल्वे पोलिसांना हा धमकीचा फोन आला होता. फोनवरुन एका व्यक्तीने मुंबई लोकल ही बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली होती. जावेद नावाच्या इसमाकडून ही धमकी बांद्रा जीआरपी पोलिसांना देण्यात आली आहे. माहिती मिळताच जीआरपी ने सर्व सुरक्षा यंत्रणांना लगेचच याबाबत माहिती दिली. यानंतर मुंबई लोकलची सुरक्षा वाढवण्यात आली असून सर्व यंत्रणा हायअलर्टवर आहे. मात्र हा कॉल कुठून आला याची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. धमकीचा फोन आल्यानंतर लोकल स्थानकावर जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. मंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये अशी घटना ऐकाला मिळाली की भितीचे वातावरण निर्माण होते. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात काही आढळून आले नाही.

Mumbai Local
गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

असाच निनावी फोन आल्याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली होती. या अफवेमुळे तेंव्हाही चांगलीच खळबळ उडाली होती. सीएसएमटी स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन व अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पश्चिम उपनगरातील बंगल्यावर बॉम्ब असल्याचा दावा दोन मद्यपींकडून खोटे कॉल करुन मुंबई पोलिसांनी झोप उडवली होती. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी या दोघांची नावे होती. आश्चर्याची बाब अशी की, या दोघांनी मुंबई पोलीस किती सतर्क आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी हा कॉल केला होता. असा दावा केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com