गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

व्हिडिओ शूटिंग, तसेच फोटोंच्या आधारे आरोपींवर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस (Sangali Police) सूत्रांनी सांगितले.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

सांगली : शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठवड्यात 7 नोव्हेंबरला झालेल्या राड्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopicand Padalkar) यांच्यावर खुनी हल्ल्याचा तर, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील (Tanhaji Patil) यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस (Sangali Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Gopichand Padalkar
ड्रग्ज प्रकरण भरकटवणाऱ्या राजकीय नेत्यांचा दंगलीत हात

पोलिसांनी याप्रकरणी दोघांच्याही आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानासाठी ठराव करण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता.

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Zihla Bank Election) धामधुमीत आटपाडीत झालेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. यासाठी जादाची पोलिस कुमत तैनात करण्यात आली आहे. एलसीबीचे (LCB) विशेष पथक आटपाडीत तळ ठोकून असून कार्यकर्त्यांच्या हालचालींवर विशेष पथकाची करडी नजर असेल, असे एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितल

Gopichand Padalkar
आरएसएस-भाजपच्या नादाला लागू नका ; आंबेडकरांचे आवाहन

दरम्यान, याप्रकरणी अद्याप संशयितांचा शोध सुरूच आहे. व्हिडिओ शूटिंग, तसेच फोटोंच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचून गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत मोटारीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या होत्या. याबाबत दहा जणांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम राबवत छापेमारी सुरू केली असून गेल्या दोन दिवसांत पंधरा ठिकाणी कारवाया केल्या असून काल (ता.13 नोव्हेंबर) वाहने जप्त करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. निरीक्षक गायकवाड यांच्यासह उपनिरीक्षक महंमद रफीक शेख, महादेव नागणे, सचिन कनप, जितेंद्र जाधव, इम्रान मुल्ला, संदीप गुरव, सुनीता शेजाळे, सविता माळी यांचे पथक यासाठी कार्यरत आहे.

धरपकडीसाठी छापेमारी सुरू

पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या धरपकडीसाठी आटपाडीसह तालुक्यातील खरसुंडी, झरे, बनपुरी, हिवतड, निंबवडे, दिघंची या ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. राडा झाला त्यादिवशीच्या चित्रफितीच्या आधारे ओळख पटवून शोध सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणूक काळात अनेकांना तालुक्यातून परागंदा व्हावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com