RBI Penalty on Banks: 'आरबीआय'चा तीन बँकांना दणका; तब्बल 10 कोटींचा दंड ठोठावला

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन बँकांवर मोठी कारवाई केली आहे.
RBI Banks
RBI BanksSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन बँकांवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे तीन बँकांना 10 कोटींहून अधिक दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये सिटी बँकेला तब्बल पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर बँक ऑफ बडोदाला 4.34 कोटींचा दंड ठोठावण्यात आला. तसेच इंडियन ओव्हरसीज बँकेला एक कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबरोबरच अभ्युदय सहकारी बँकेवरही कारवाई करत बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

RBI Banks
State Government Announcement : राज्य सरकारची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईमध्ये तीन मोठ्या बँका तर पाच सहकारी बँकांचा समावेश आहे. या बँकाना वारंवार सूचना देऊन देखील या बँकांनी नियम धाब्यावर बसवल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाई करण्यात आली असली तरी याचा कोणताही परिणाम ग्राहकांवर होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कारवाई करण्यात आलेल्या बँकांना त्यांची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली आहे. कारवाई केलेल्या सहकारी बँकामध्ये वेजलपुर नागरिक सहकारी बँक, श्री महिला सेवा सहकारी बँक, सर्वोदय नागरिक सहकारी बँक, पोरबंदर विभागीय नागरिक सहकारी बँक, खंबात नागरिक सहकारी बँकेचा समावेश आहे.

दरम्यान, अभ्युदय सहकारी बँकेवर प्रशासक नेमत बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. आता पुढील 12 महिन्यांसाठी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त असणार आहे. तर प्रशासकीय कामकाजामध्ये अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

RBI Banks
Pimpri Chinchwad News : निलंबित लाचखोरांना पिंपरी महापालिकेने पुन्हा घेतले कामावर, फडणवीसांचे नागपूरही चर्चेत आले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com