Ajit Pawar Politic's : अजितदादांचा ठाकरे, शरद पवारांना दे धक्का...तीन माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

Three former MLAs Meet Ajit Pawar : लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र, विधानसभेला मिळालेल्या यशानंतर अजित पवारांकडे अनेकांचा ओढा दिसून येत आहे.
Ajit Pawar-Jayant Patil-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Ajit Pawar-Jayant Patil-Sharad Pawar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 02 December : लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र, विधानसभेला मिळालेल्या यशानंतर अजित पवारांकडे अनेकांचा ओढा दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालेगाव पूर्वचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजितदादांची भेट घेतली आहे. याशिवाय शिराळा (जि. सांगली) माजी आमदार मानसिंगराव नाईक हेही अजितदादांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्ता मिळताच अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुगीचे दिवस येताना दिसत असून तीन माजी आमदार पक्षाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार निवडून आले होते. त्या निकालानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी अजितदादांची साथ सोडली होती. मात्र, खचून न जाता अजित पवार यांनी एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून पक्षासाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला.

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा सत्तेत बसणार, हे लक्षात येताच सोडून गेलेले नेते पुन्हा एकदा अजित पवारांच्या भेटीसाठी येताना दिसून येत आहे. विशेषतः तरुण नेते पुन्हा अजित पवारांसोबत काम करण्यासाठी इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

Ajit Pawar-Jayant Patil-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Nilima Nikam : 'अहो मोठ्ठ्या ताई..तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला?', निकमांच्या लेकीचे पूर्वा वळसेंना सडेतोड उत्तर

राहुल जगताप हे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत अपयश आल्याने ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मालेगाव पूर्वचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांची साथ सोडून भाऊ अद्वैत हिरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. अद्वैत हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा विधानसभेला पराभव झाला.

Ajit Pawar-Jayant Patil-Sharad Pawar-Uddhav Thackeray
Ambegaon Politic's : ज्यांनी वळसे पाटलांचा फोटो देव्हाऱ्यात ठेवला; तेच आज त्यांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत का? पूर्वा वळसेंचा भावूक सवाल

सांगली जिल्ह्यातील शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईक हेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. तेही लवकरच अजितदादांची भेट घेणार असून शरद पवार यांची साथ सोडून ते अजितदादांच्या गटात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नाईक यांना पक्षात घेऊन अजितदादा हे जयंत पाटील यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com