Tiger Shroff firing case : जुहू गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हल्ल्यानंतर टायगरनेच गाडी चालवत दोघांना नेले हॉस्पिटलमध्ये

Tiger Shroff firing case news : या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून या हल्ल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफला गोळी लागली नाही. टायगर सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
Tiger Shroff
Tiger ShroffSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbi news : मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन समोरच अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफसह दोघेजण जखमी झाले. या मध्ये टायगर श्रॉफच्या गाडीचा चालक व अन्य एकजण जखमी झाला. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे समजते. या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून या हल्ल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफला गोळी लागली नाही. टायगर सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर टायगरनेच गाडी चालवत दोघांना हॉस्पिटलमध्ये नेले.

जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याच्या चालकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफवर गोळीबार केला. दरम्यान, या हल्ल्यात गाडीचा चालक गंभीर असून हल्ल्यानंतर टायगरने स्वतः गाडी चालवून दोघांना रुग्णालयात नेले आहे.

जुहू पोलीस स्टेशन (Police station) समोरच अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस स्टेशनच्या समोर असलेली गल्लीमध्ये सहा ते सात राउंड गोळीबार झाला आहे. आरोपी हे बाईकवर आले होते. गोळीबार करुन ते फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी सहा ते सात राउंड गोळीबार केला आहे.

Tiger Shroff
Political Crime : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत राडा; नागरिक, पत्रकारांना मारहाणीच्या आरोपावरून १६ भाजप नगरसेवकांविरोधात गुन्हा

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी लावून आरोपीचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफला गोळी लागली नाही. टायगर सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्यानंतर टायगरने स्वतः गाडी चालून दोघांना रुग्णालयात नेले आहे.

Tiger Shroff
Social Boycott Maharashtra : प्रेमविवाह केला म्हणून जातपंचायतीचा दंड अन् बहिष्काराचा आरोप; पोलिसांकडे तक्रार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com