शिवछत्रपतींच्या राज्यात टिपू सुलतानचे नाव नको, लोढा यांनी दिला हा इशारा..

मालाड येथील क्रीडांगणाला टिपू सुलतानाचे नाव देण्याविरोधात भाजपचे (BJP) आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी एल्गार पुकारला आहे.
Uddhav Thackeray & Mangalprabhat Lodha
Uddhav Thackeray & Mangalprabhat LodhaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई, मालाड येथील क्रीडांगणाला टिपू सुलतानाचे नाव देण्याविरोधात भाजपचे (BJP) मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी एल्गार पुकारला असून आज (ता.27 जानेवारी) पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी चारकोप पोलिस (Mumbai Police) ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

Uddhav Thackeray & Mangalprabhat Lodha
सत्तारांचा सेना-भाजप युतीबाबत पुनरुच्चार; आता कारणही सांगितले..

लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मैदानाला टिपू सुलतान नाव देणे ही दुर्दैवी बाब आहे. महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) हा प्रयत्न निषेधार्ह आहे. मालाडच्या या मैदानाचे 'वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ हे नामकारणच बेकायदेशीर आहे, असे लोढा यांनी यावेळी सांगितले. तसेच, स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे (Congress) नेते मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी हे नामकारण केले आहे. ते बेकायदेशीर आहे, असे राज्यातील महाविकास आघाडी सरकार सांगत नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरु राहील, असा इशाराही लोढांनी यावेळी दिला.

मुंबईसह राज्यभरात मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहेत. मालाड-मालवणी भागात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना त्या भागातून हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. या क्रीडासंकुलाच्या नामकरणावरून हे सिद्ध झाले आहे, असेही लोढांनी यावेळी दाखवून दिले.

Uddhav Thackeray & Mangalprabhat Lodha
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही कागदपत्रांची पडताळणी केली; हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा!

दरम्यान, मालाड येथील क्रीडांगणाला टिपू सुलतानाचे नाव देण्याविरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. काल येथे भाजप, विहिंप व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागले होते. यामुळे काहीकाळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाई नंतर भाजप नेते चांगलेच भडकले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. काल केलेल्या कारवाई नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस या शब्दात महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तर, कॅाग्रेसकडून सचिन सावंत यांनी टीपू सुलतान यांच्या गौरवार्थ काढलेल्या शब्दोल्लेख व्हिडीओ शेअर करत भाजपला टोमणा लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com