राज ठाकरेंच्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस; संजय राऊत म्हणाले...

Raj Thackeray| Sanjay Raut| MNS-Shivsena| महाराष्ट्राची शांतताच खराब करायची असेल आणि त्यासाठी त्यांना कुणी सुपारी दिली असेल तर सरकारने सर्वात आधी सुपारी देणाऱ्याांचा शोध घेतला पाहिजे.
Sanjay Raut|
Sanjay Raut|
Published on
Updated on

मुंबई : अरे कसला अल्टिमेटम? काय होतं अल्टिमेटमने? अल्टिमेटवर देश चालतो का? अनेकांनी 100 दिवसात महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं, झाली का महागाई कमी? त्यांनी स्वत:चं पाहावं स्वत:चा पक्ष सांभाळावा, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमची खिल्ली उडवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशात जी भूमिका घेतली जाईल तिचं महाराष्ट्रात घेतली जाईल. या राज्यात कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर कृत्य केलं जाणार नाही, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)त्यासाठी सक्षम आहेत. सर्वात अनुभवी नेते खासदार शरद पवार आहेत. त्यामुळे जर कोणी अल्टिमेटम देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार असतील तर ते भ्रमात आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे, या राज्यात असं काहीही होऊ शकत नाही, राज्याची जनता सुज्ञ आहे, असा विश्वासही यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.

जर एखाद्याला महाराष्ट्राची शांतताच खराब करायची असेल आणि त्यासाठी त्यांना कुणी सुपारी दिली असेल तर सरकारने सर्वात आधी सुपारी देणाऱ्याांचा शोध घेतला पाहिजे. हे जे चाललंय ना हिंदू ओवैसींना सुपारी देऊन महाराष्ट्राची शांतता बिघडवण्यासाठी, मला वाटतं सरकार सक्षम आहे त्यासाठी. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो चर्चा केली. सर्व रिलॅक्स आहेत. कुणी मनात आणलं म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू शकत नाही. इतकं राज्य मजबूत पायांवर उभं आहे. या राज्याच्या प्रशासनाला फार मोठा अनुभव आहे, राज्यकर्त्यांनाही राज्य चालवण्याचा फार मोठा अनुभव आहे. कोणीही उठतो आणि धमक्या देतो, हे करू ते करू, तर असं होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

धमक्या देणाऱ्यांची ताकद नाही. त्यांच्यामागे ज्या शक्ती आहेत, जे अस्वस्थ आत्मे आहेत, त्यांना महाराष्ट्रात सत्तेत येता आले नाही. महाराष्ट्रातून लोकांनी त्यांना दूर केलेलं आहे. त्यांचे जे वैफल्य आहे ते दुसऱ्यांच्या माध्यमातून बाहेर काढत आहेत. याला शौर्य म्हणत नाही. त्यांनी समोरून लढलं पाहिजे. ते अशापद्धतीने सुपाऱ्या देऊन लढत असतील तर त्यांनी ते करत राहाव, त्यातंच त्यांचा वेळ जाणार आहे. सरकार सरकारचे काम करत आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात राज ठाकरे यांचा उपवस्त्र असा उल्लेख केला आहे, त्याबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, उपवस्त्राचा अर्थ समजून घ्या माणसाला जे वापरण्यासाठी ठेवले जातात, त्याला उपवस्त्र म्हणतात. महाराष्ट्राच्या राजकारणता असे वापर सध्या सुरु आहेत. महाविकास आघाडी, शिवसेनेवर हल्ले करण्यासाठी अशा उपवस्त्रांचा वापर सुरु आहे. ज्यांची स्वत:ची हिंमत नाही अशी बिनहिमतीची लोक असे छोटे मोठे पक्ष पकडतात आणि शिवसेनेवर, महाविकास आघाडीवर हल्ले करण्यासाठी वापरले जातात.

राज्यात एक प्रशासकीय व्यवस्था आहे. कायद्याचं राज्य आहे म्हटल्यावर कुणाच्या अल्टिमेटमवर निर्णय घेतला जात नाही. राज्यात शांतता आहे. कुणी सभेतून इशारे दिले, धमक्या दिल्या म्हणजे परिस्थिती बिघडली असं होत नाही. तेव्हा कुणी भ्रमात राहू नये. आम्ही काही इशारे दिले म्हणजे अॅक्शन होत आहे असं होत नाही. आज चांगला दिवस आहे. अक्षय तृतीया आहे, रमझान आहे, लोकांना त्यांचा उत्सव साजरी करू द्या, असेही त्यांनी म्हटले आहे. जे वाद निर्णाण करुन वादाला फोडणी घालत आहेत, त्यांचे मनसुबे कधीही पुर्ण होणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com