एसटी कर्मचाऱ्यांचे आजचे आंदोलन संशयास्पद; पोलिसांनी चौकशी करावी...

Sharad Pawar|Dhananjay Munde: शरद पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने राहिले आहेत. मात्र कुठलेही आंदोलन अश्याप्रकारे नेत्याच्या घरापर्यंत गेलेलं आपण आजपर्यंत पाहिले नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
 dhananjay munde
dhananjay munde Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात चालू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलनाने आज (ता.8 एप्रिल) नाट्यमय वळण घेतले. काल उच्च न्यायालयाने (High Court) एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाची मागणी फेटाळत २२ एप्रिलपर्यंत त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र, या निर्णयावर नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत आक्रमक झाले आणि आज दुपारी ३ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी धाव घेत आंदोलन केले.

 dhananjay munde
Video: पवारांच्या घरावर चप्पल फेक का झाली ?

शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. तसेच, पवारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. या आंदोलनावर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने उभे राहिले असून आतापर्यंतचे कुठलेही आंदोलन अश्याप्रकारे नेत्याच्या घरापर्यंत गेलेलं आपण बघितल नाही. महाविकास आघाडी सरकारने जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाही. घरावर दगड फेकून किंवा चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाहीत, अशा शब्दात मुंडेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 dhananjay munde
ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होवू नये; आजही हीच भूमिका : जितेंद्र आव्हाड

मुंडे म्हणाले, पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने राहिले आहेत. कुठलेही आंदोलन अश्याप्रकारे नेत्याच्या घरापर्यंत गेलेलं आपण आजपर्यंत पाहिले नाही. या सरकारने जे काही निर्णय एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतले नाही. अश्याप्रकारे घरावर दगड किंवा चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाही. आजचे आंदोलन हे अतिशय दुर्दैवी आहे. एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना कदाचित इतिहास माहित नसावा की पवार साहेबांनी कामगारांच्या कल्याणासाठी आपली हयात घालवली आहे. मात्र, आज त्यांच्या घरावर जे आंदोलन झाले ते संशयास्पद आहे. एकाबाजुला आझाज मैदानात जल्लोष करण्यात आला, तर दुसरीकडे पवार साहेबांच्या घरासमोर आचानक आंदोलन कसे करण्यात आले? हा लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचा प्रकार असल्याचे मुंडेंनी म्हणत या घटनेवर निषेध व्यक्तत केला आहे.

 dhananjay munde
हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया : म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण..."

पवार साहेब आमचं दैवत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना जे काही मिळाले ते पवार साहेबांच्या मध्यस्थीमुळेच मिळालेले आहे. हे एक षडयंत्र असून याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. देशाच्या व राज्याच्या माणसासाठी त्यांनी आपल आजपर्यंत आयुष्य वाहिल आहे. त्यांच्या निवासस्थानी, असा प्रकार घडला आहे. संपूर्ण राज्याची शांतता बिघडवण्याचा हा प्रयत्न कुणाकडून सुरु आहे, याबाबतचा तपास झाला पाहिजेत तर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुंडेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com