Shivsena : आजारपणाचा फायदा घेत 'त्यांनी' घात केला; ठाकरेंची भावनिक साद

आमच्या सारख्या चांगल्या लोकांना राजकारणात जागा आहे का हा प्रश्न आता पडला आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeray sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना आम्ही सर्व काही दिले आणि त्यांनीच आम्हाला धोका दिला, कुठे काय जोडायचे त्याला तुम्हीच पहा; पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की देशात लोकशाही आता राहिली आहे का? अशी खंत शिवसेनेचे नेते, माजी मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी व्यक्त केली. (aditya thackeray latest news)

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला कालपासून (शुक्रवार) सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. २१६ ला भेट दिली. येथील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरे साहेबांच्या आजारपणाचा फायदा घेत "त्यांनी" घात केला," अशा भावना व्यक्त केल्या.

"जे कोणी मातोश्रीवर येत आहेत, त्यांची निष्ठा आम्हाला कळते. अनेक नागरिक उद्धव साहेबांसोबत उभे आहेत. त्यांनी जो काही आम्हाला धोका दिला आहे, त्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्यांच्या चेहर्‍यावरील भाव पाहून मी असेल किंवा उद्धव साहेब असतील आमच्या सारख्या चांगल्या लोकांना राजकारणात जागा आहे का हा प्रश्न आता पडला आहे," असे ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
विरोधीपक्षनेते अजितदादांच्या कामांचा सपाटा सुरु..

"आम्ही जेव्हा अनेक ठिकाणी फिरतो तेव्हा लोक येऊन भेटतात तेव्हा कळते की मागील दोन-अडीच वर्षात जे काही काम झाले ते जनतेने पाहिले आहे. मतदारांनी पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे मतदारांनी निवडून आणलेले हे आमदार फुटले तर देशात लोकशाही राहिली आहे का असा प्रश्न निर्माण होतो," असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

"शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केले, अशा हास्यास्पद प्रतिक्रिया कोणी देत असतील तर त्याकडे लक्ष देऊ नका. जे काही घडले ते संपूर्ण देशाने पाहिले.लोकशाहीच्या विरोधात कशी पावले उचलली गेली हे देशातील जनतेनं पाहिलं, " असे ठाकरे यांनी स्पष्ट केलं

आदित्य ठाकरे म्हणाले..

  • माझी निष्ठा यात्राही महाराष्ट्र प्रत्येक कोपऱ्यात जाणार आहे.

  • ही निष्ठा यात्रा कोणाच्याही विरोधात नाही.आमचं कुणीही टार्गेट नाही.

  • उद्धव साहेबांच्या सर्जरीचा गैरफायदा घेऊन 'त्यांनी' हा धोका दिला.

  • पुन्हा सांगतो हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा.

  • आम्ही समाजकारण जास्त केले म्हणून कदाचित असा धोका झाला असेल.

  • उद्धवजींनी सांगितले की आमच्या घराचे दरवाजे खुले आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com