बारामती : एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला (ncp) आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादीमधून विरोधी पक्षनेतेपदी (Leader of the Opposition in the Assembly) कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. अखेरीस राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली. (Ajit Pawar news update)
महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही अजित पवार यांच्या कामाची पद्धत सर्वांना परिचित होती. आता विरोधीपक्षनेते असतानाही त्यांनी आपली कामे नेहमीप्रमाणेच सुरु ठेवली आहेत. त्याचा प्रत्यय आज आला.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यावर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतरही तेवढ्याच ऊर्जेनं कामाचा सपाटा लावला आहे. आज (शनिवारी) सकाळी सहा वाजता त्यांनी बारामतीत विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत काही प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बारामतीत विविध विकासकामांची पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांना काही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनींशी त्यांनी संवाद साधला. पुढच्या दौऱ्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
अजित पवार हे सकाळीच आपल्या कामांना सुरवात करतात. बैठका, विकासकामांची पाहणी करण्यासाठी अजित पवार हे सकाळी लवकरच उपस्थित राहत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेहमीच धावपळ होते. काही महिन्यापूर्वी अजित पवार यांनी पुण्यात मेट्रोच्या कामाची पाहणी सकाळीच केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.