Tamil Nadu : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट करणारे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या अडचणीत वाढ होत होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात उदयनिधी स्टॅलिन यांनी गु्न्हा दाखल केला आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपासह विविध स्तरातून टिका करण्यात येत आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या विधानात तोडमोड करुन मालवीय यांनी त्यावर आपल्या पोस्टमध्ये टिका केली असल्याचे स्टॅलिन समर्थकांचे मत आहे.
याप्रकरणी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली पोलीस ठाण्यात मालवीय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'डीएमके'ने याबाबत तक्रार दिली होती.
"उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला," असे 'डीएमके'चे मत आहे.काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारलं होते. “हिंदूंना शिव्या देण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. सनातन धर्माला संपवण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहेत. पण, सनातन धर्माला कोणी संपवू शकले नाही. एक हजार वर्षे भारत गुलाम होता. एक हजार वर्ष सनातन धर्माला संपवण्याचे प्रयत्न झालेत,” असे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद म्हणाले.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन..
“आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं. "सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे," असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.