वानखेडेंच्या अडचणीत वाढ; दोन दलित संघटनांनी केली तक्रार

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप होत आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeFile Photo

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

वानखेडेंचा जात प्रमाणपत्र खोटे आहे, असा दावा करीत दोन दलित संघटनांनी मुंबई शहर जिल्हा जातपडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि भीम आर्मी अशी या संघटनांची नावे आहेत. वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ते अनुसूचित जातीतील असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले, असा दावा या संघटनांनी केला आहे. वानखेडे यांच्या विरोधात अधिकृत तक्रार जात पडताळणी समितीकडे दाखल झाल्याने ते अडचणीत आल्याची चर्चा आहे.

Sameer Wankhede
मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत होताच माजी मुख्यमंत्री धावले मदतीसाठी!

वानखेडे यांनी दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली. वानखेडे यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. माझ्याकडील कागदपत्रे मी आयोगासमोर सादर केली आहेत. माझ्या तक्रारीची खातरजमा लवकरच केली जाईल आणि त्यावर आयोगाचे अध्यक्ष उत्तर देतील, असे वानखेडे यांनी या भेटीनंतर सांगितले होते. यानंतर बोलताना आयोगाचे अध्यक्ष सांपला म्हणाले होते की, समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्याआधारे त्यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही.

Sameer Wankhede
केंद्राच्या कर कपातीनंतर राज्याचाही कर कमी झाला! मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला होता. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली होती. हलदर म्हणाले होते की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com