Uddhav Thackeray : आता ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई; मुंबई पुन्हा ताब्यात घेण्यासाठी 'प्लॅनिंग' सुरू

Uddhav Thackeray Planning Municipal Elections : येत्या काही महिन्यातच राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. 2024 निवडणुकींचं वर्ष ठरलं आता राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमध्ये मिळालेलं यश, अपयश मनावर न घेता उद्धव ठाकरे यांनी कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत. 2024 निवडणुकींचं वर्ष ठरलं आता राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष चर्चा, बैठका आणि पुन्हा एकदा पक्षबांधणी करत आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीला मिळालेलं अपयशानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता उद्धव ठाकरे नव्याने पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली असून पक्षाच्या नेत्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून 'शिव सर्वेक्षण यात्रा' सुरु करण्यात आली होती.

Uddhav Thackeray
BJP Politics : "मी लायक नसेन..." मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सलग 3 वेळा विजयी झालेल्या भाजप आमदाराने व्यक्त केली खदखद

26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबरला विधानसभा निहाय बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत सादर केला होता.

दरम्यान, जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. त्या शाखांमधील प्रमुखांची मते जाणून घेऊन आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनिती ठरवणार आहेत. 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र देखील सुरु होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

Uddhav Thackeray
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची वर्षाअखेर गोड! डिसेंबरचा हफ्ता आजपासून खात्यात जमा होणार, पण रक्कम किती?

पदाधिकारी आढावा बैठक-

26 डिसेंबर - बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा

27 डिसेंबर -अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा

28 डिसेंबर -मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द - शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा

29 डिसेंबर - धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com