
Mumbai News: राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 'डिसेंबरचा हप्ता आठवडाभरात देऊ' असं वक्तव्य केलं होतं.
त्यानुसार आता सरकारकडून हा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याबाबतच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना सरकारकडून आनंदाची बातमी दिल्याचं पाहायला मिळत आहे.
महायुती (Mahayuti) सरकारच्या घवघवीत यशात महत्वाची भूमिका बजावलेली लाडकी बहीण योजना यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तर या योजनेचा रखडलेला हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
त्यानुसार आता डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयांनुसार सहावा हप्ता लवकरच जमा होणार आहे. शिवाय डिसेंबरच्या या हप्त्यासाठी सरकारकडून 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 7500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. तर आता उरलेल्या डिसेंबर महिन्याचा हफ्ता देखील लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.
डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपयांप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे. महत्वाची बाब म्हणजे हा हप्ता 2100 रुपयांचा असेल अशी आशा लाडक्या बहिणींना होती.
मात्र, सध्या तरी डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे दिला जाणार आहे. मात्र, महायुतीने सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार महिलांना दरमहा 2100 रुपये अर्थसंकल्पानंतर दिले जाणार आहेत. त्यामुळे सध्या तरी 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.