

Mumbai News, 28 Oct : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा काल (सोमवार) मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडला. या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख केला.
ठाकरेंनी शहांना अॅनाकोंडा म्हणल्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या या टीकेला भाजपने देखील जशाच तसं उत्तर दिलं आहे. भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा अजगर असा उल्लेख करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बावनकुळेंनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा अजगर असा उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा गरळ ओकली.
इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात. आदरणीय अमितभाई शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात, 370 कलम रद्द करून इतिहास रचतात. आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदीजी आणि अमित भाईंवर टीका करण्याचा उद्योग करतात, असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं.
तर यावेळी त्यांनी या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. 25 वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांवर दोष देतोय, अशी जहरी टीकाही ठाकरेंनीवर केली.
शिवाय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे त्यांना चांगले ठाऊक असल्याने आता स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी ते अशी विवेकभ्रष्ट टीका करीत आहेत.
मात्र, उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला आहे. एकवेळ अशी येईल की, मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही, असंही बावनकुळे यांनी आपल्य ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मुंबईतील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर बोलताना म्हणाले, 'आज एकजण मुंबईत येऊन गेले. योगायोग म्हणजे आज मी दोन बातम्या वाचल्या. पहिल्या पानावर भाजप कार्यालयाचं उद्धघाटन आणि दुसऱ्या पानावर एक बातमी होती.
त्यामध्ये जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार आहे. पण अॅनाकोंडा म्हणजे सर्व काही गिळणारा साप होय आणि तो आज इकडे येऊन भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. मुंबई गिळायची का? पाहतो कशी गिळणार. नाही पोट फाडून बाहेर आलो तर नाव सांगणार नाही.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.