

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटले आहेत. वर्धापन दिना निमित्त आयोजित सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता होती. त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांचे समाचार घेतला. मात्र, आपले सहा खासदार फुटले यासाठी मतदारांची माफी मागितली.
ते म्हणाले,'माफी मागतोय, माझ्यावर विश्वास ठेऊन यांना निवडून दिलं. मोदींचा चेहरा न वापरता नऊ खासदार निवडून आणले.'
'आज परत फोडाफोडी केली. काय मिळवायचं तुम्हाला, किती सत्ता पिपासू व्हायचं. सरदार वल्लभ पटेलांनी पोलिस कारवाई केली. मराठवाड्यात पोलिस घुसवले, मराठवाडा मुक्त निजामापासून मुक्त केला. आणि तुम्ही बंगालमध्ये पोलिस घुसवले.'
'दोन-अडीच लाख पोलिस दल बंगालमध्ये घुसवले. ममता बॅनर्जीची सत्ता हटवण्यासाठी. त्या महिलेच्या मागे लागला. सव्वा दोन लाख फौज तुम्ही मणिपूरमध्ये का नाही घुसवली. पाकव्याप्त कश्मीर मध्ये घुसवा तुम्हाला आम्ही पाठींबा देऊ.', असे ते म्हणाले.
'आज आपल्याला विरोध करतायेत तेच आहेत शिवसेनाप्रमुखांना विरोध केला. आजोबांना ज्यांनी विरोध केला गोमुत्रधारी होते. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे. शेंडी जाणव्याचे आहेत. जो भगव्यात भेसळ करतो तो हिंदू असू शकत नाही.', असे देखील ते म्हणाले.
देश असच चालत राहिला तर देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. जोतिष्यावर माझा विश्वास नाही. तुम्ही भवितव्य आहात. ज्या देशात झुरळ म्हटलं जातं त्या देशाचं भवितव्य काय असणार आहे. आपल्याला ऑपरेशन कमळ करावा लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.