Uddhav Thackeray On Modi : उध्दव ठाकरेंचं खुलं आव्हान; म्हणाले,'' हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी...''

Shivsena Political News : '' सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस...''
Modi Government, Uddhav Thackeray
Modi Government, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : '' आपल्या घरात येऊन दमदाटी करतात. फोडाफोडी करतात. आम्ही नामर्दाची औलाद नाहीत. सत्तेची मस्ती हा फुगलेला फुगा आहे. हा फुगा फोडायला वेळ लागणार नाही. मस्ती मणिपूरमध्ये जा आणि दाखवा. तिथं लोकं ईडी, सीबीआय यांना विचारत नाही. मणिपूर पेटला. तिथं काय केलं अमित शाह यांनी असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच विश्वगुरू अमेरिकेत विकत घेतलेल्या माणसांसमोर आपलं ज्ञान पाजळतात. हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं'' असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.

ठाकरे गटाचं वरळी येथे रविवारी( दि.१८) शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी शाह, शिंदे - फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठीक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस(Devendra Fadnavis). कारण त्यांचा होणारा अपमान त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण वरून आदेश आला आहे असा टोलाही ठाकरेनी यावेळी फडणवीसांना लगावला.

Modi Government, Uddhav Thackeray
Imtiaz Jalil On Prakash Ambedkar : आंबेडकरांच्या भूमिकेला एमआयएमचा पाठिंबा, इम्तियाज अजूनही आशावादी ?

'' सावकरांनी मोदी आणि फडणवीसांसाठी...''

कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा वगळला आहे, याचा शिवसेना निषेध करतेच. सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. सावरकरांनी कष्ट करून, मरण यातना भोगून जो देश स्वातंत्र्य केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्यसंग्रामात काडीचाही संबंध नव्हता अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते आहे, यावर तुमचं मत काय? असा सवाल उपस्थित करतानाच सावकरांनी मोदी आणि फडणवीसांसाठी कष्ट आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या का? असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला.

पण देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल, तर आपल्या देशाला स्वत:च्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिंमत असेल तर करून दाखवा. देशाचं स्वातंत्र आणि देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही भाजपा(BJP) व्यतिरिक्त इतर पक्ष एकत्र येतोय असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

Modi Government, Uddhav Thackeray
BRS News : भाजपच्या पावलावर बीआरएसचे पाऊल, त्यांच्याच बालेकिल्ल्यातून सुरुवात; गुलाबी वादळ येणार?

'' गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा...''

ठाकरे म्हणाले, गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावानाचं नेतृत्व करायला मला आवडेल. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तर परवा जागतिक गद्दार दिन आहे. तुम्ही आधी हात उचलू नका, पण कुणी केला उचलला तर तो हात वेगळा करा असा आदेशही ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

आम्ही नामर्दाची औलाद नाही. यापुढे आमच्या पानिपतच्या युध्दावेळी ही अब्दाली बाहेर पडून आला होता. त्याचं नावही शाह होतं. अमित शाह नाही असा टोलाही उध्दव ठाकरें (Uddhav Thackeray)नी यावेळी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com