अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा; उद्धव ठाकरेंचे मार्मिक टोले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मोदी सरकारवर टीका
Uddhav Thackeray latest marathi News
Uddhav Thackeray latest marathi NewsSarkarnama

मुंबई : व्यंगचित्र काय करु शकते याचे उदाहरण म्हणजे शिवसेना. मार्मिकने शिवसेनेची (Shivsena) बीजे पेरली. अस्वस्थ मन हेरल आणि शिवसेना जन्मली नंतर सामनाचा जन्म झाला. आजोबांपासून विचारांची पेरणी झाली. ज्यावेळा मार्मिकचा जन्म झाला ते साल १९६० तेव्हा देशाचे स्वातंत्र्य १३ वर्षांचे होते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

व्यंगचित्र साप्ताहिक "मार्मिक" च्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेकांना मार्मीक टोले लगावले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, म्हणता म्हणता ६२ वर्ष झाली माझ. पण वय ६२. मार्मिक ६२ व्या वर्षी चिरतरुण. आजोबा बाळासाहेब म्हणायचे विचाराने माणूस थकता कामा नये. देसाई रावते चिरतरुण. मार्मिक शिवसेना हे तरुणांचे आकर्षण, असल्याचे त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray latest marathi News
`मला सतत परळी सांभाळा, असं सांगतात.. माझी एक चूक महागात पडली...`

अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. पण ते सोसल का? लष्करात कपात करण्याची बातमी धोकादायक आहे. लष्कर प्रचंड असायलाच हवे. चीन, अमेरिका यांनी आधुनिकीकरणसाठी सैन्य कपात केल्याचे ऐकिवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत पण लष्करासाठी नाहीत. नुसता तिरंगा लावून चीन परत जाणार का? घरावर तिरंगा हा लष्कराला वाटायला हवे आम्ही सोबत आहोत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.

Uddhav Thackeray latest marathi News
फडणवीसांनी सांगितले, बावनकुळेंचे २०१९ मध्ये तिकिट कापण्यामागचे कारण...

या वेळी ते म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपली होती. बाळासाहेबांनी विचार केला व्यंगचित्र साप्ताहिक काढले. मुंबई मिळवली तरी मराठी माणसावर अन्याय होताच. अन्याला वाचा फोडण्याचे काम मार्मिकने केले. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना आणि व्यंगचित्र काढली. आता व्यंगचित्रकार किती हा वादाचा विषय आहे. पण व्यंगचित्रकार असायलाच हवा. महाराजांच्या काळात जे शाहीर काम करायचे तेच सामर्थ व्यंगचित्रकाराच्या रेषेत आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com