Uddhav Thackeray : ''समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय?'' ; उद्धव ठाकरे कडाडले!

Manoj Jarange Patil : ''जरांगे-पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही.'' असंही म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray and Maratha Agitation : मराठा आरक्षण आंदोलना आता अधिकच तीव्र होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून, त्यांची प्रकृती वरचेवर खालावताना दिसत आहे. मराठा समाज बांधवांकडून त्यांनी पाणी पिण्याची विनंती केली जात आहे, मात्र जरांगे पाटील नकार देत आहेत. त्यांनी सरकारला जोपर्यंत मला बोलता येतय तोपर्यंत चर्चेला या असा सूचक इशाराही दिला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना आता अधिकच तीव्र होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray News
Harshvardhan Jadhav News : आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव ट्रोल झाल्यानंतर गप्प..

दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी मराठा समाजातील युवक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर, कालरात्री बीड जिल्ह्यात अचानक रास्ता रोको होऊन, परिवनह मंडळाची एक बसही पेटवली गेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आझ शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, ''मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.''

Uddhav Thackeray News
Bawankule On Thackeray: 'आता कसं वाटतं...?' बावनकुळेंचा ठाकरेंना खोचक टोला

याचबरोबर ''जरांगे-पाटील उपोषण करीत आहेत, पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे.. पण त्यांचे मन निर्दयी आहे. जरांगे-पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही.'' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी १० वाजता मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यामधील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडून ससरकारने माहिती मागवली आहे. आतापर्यंत काय कामे केली, याबाबतचा अहवाल उपसमितीला सादर करायचा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com