Thackeray-Shinde CM Post :उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव सुचविले होते : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

अगदी सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्रीपदासाठी काही नावाची चर्चा होती.
Chhagan Bhujbal-Uddhav Thackeray- Eknath Shinde
Chhagan Bhujbal-Uddhav Thackeray- Eknath ShindeSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Uddhav Thackeray had suggested name of Eknath Shinde for the Chief Minister post : Chhagan Bhujbal)

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर प्रथम शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या बैठका सुरू होत्या. अगदी सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्रीपदासाठी काही नावाची चर्चा होती. त्यावेळी शिवसेनेकडून म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह तीन सुचवली होती. मात्र, महाविकास आघाडीत उर्वरीत दोन पक्षाकडे अनेक वर्षे सरकारमध्ये काम केलेले ज्येष्ठ नेते हेाते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांनीच स्वीकारावे, अशी विनंती महाविकास आघाडीकडून करण्यात आली होत, असे माजी मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal-Uddhav Thackeray- Eknath Shinde
NCP News : राष्ट्रवादीचा बडा नेता घेणार अमित शहांची भेट

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः मांडली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह इतर दोन नावे मागे पडली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे यांनीच शिंदे यांचेच नाव प्रथम मुख्यमंत्रीपदासाठी सुचविले होते, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

Chhagan Bhujbal-Uddhav Thackeray- Eknath Shinde
Shinde Vs Thackeray : शिंदे गट आणखी एक नवा डाव टाकण्याच्या तयारीत; ठाकरेंच्या उत्तराकडे असणार महाराष्ट्राचे लक्ष

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वेळी सरकार स्थापन करण्यामागेही त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. राष्ट्रवादीच्या काही आमदारांची फाटाफूट झाली हेाती, त्यावेळी शिंदे यांनीच आघाडी सांभाळली होती. मात्र, अडीच वर्षांनंतर ते महाविकास आघाडी आणि शिवसेनेतून बाहेर पडत उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com