Kolhapur News : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरे गटालाच मिळावी, असा दावा पहिल्यापासून ठाकरे गटाने केला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागाही ठाकरे (Loksabha Election) गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण उमेदवार कोण? यावर एकमत न झाल्याचे चित्र आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची गड ठाकरे गटाला काँग्रेसच्या बळावरच लढवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस ज्या उमेदवाराला संमती देईल तोच उमेदवार ठाकरे गटाला द्यावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दोन महिन्यांपासून भाजपने केंद्रातील विविध योजना या सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. विकास यात्रेच्या माध्यमातून घरोघरी पोहचून भाजप लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. तर महाविकास आघाडी अद्याप उमेदवारीतच अडकून पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार नसला तरी दोन चेहरे आतापर्यंत समोर आले आहेत.
गोकुळचे संचालक चेतन नरके आणि माजी आमदार संजय घाटगे या दोघांचा समावेश आहे. वास्तविक शिवसेनेचे दोन खासदार, एक आमदार, आणि दोन माजी आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे अस्तित्व अल्प आहे.
पाच दिवसांपूर्वी सतेज कृषी प्रदर्शनाचा समारोप पार पडला. या समारोपाला शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांची उपस्थिती होती. त्यावरून आमदार सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील यांची लोकसभेसाठी घाटगे यांना संमती असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी 'मातोश्री'वरून कृषी संचालक चेतन नरके यांना संपर्क साधून लोकसभेबाबतची चर्चा केली होती. या चर्चेत नरके यांना उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा आहे.
वर्षभरापासून चेतन नरके यांनी लोकसभेबाबत आपले वातावरण तयार केले आहे. मतदारसंघातील 1,255 गावांचा संपर्क करून दंड थोपाटले आहेत. शहरातील पोस्टरबाजी करून त्यांनी वातावरण निर्मिती केली आहे.
एकंदरीत कोणत्याही परिस्थितीत लोकसभेला सामोरे जायचे या भूमिकेत नरके यांची वाटचाल सुरू आहे. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसची (Congress) संमती असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे अवघे काही दिवस शिल्लक असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये घोळच असल्याचे चित्र आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.