Uddhav Thackeray : 1966 चा काळ पुन्हा उभा करायचा..? ठाकरीशैलीत उद्धव यांचा इशारा

Uddhav Thackeray warning to the grand coalition government from Mumbai : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित 'आरसीएफ' कर्चमारी संघटनेच्या कार्यालयात उद्घाटन झालं. मुंबईतले मोक्याचे भूखंडांच्या विक्रीवर, मुंबईतील मराठी माणसांच्या अवहेलनेवर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला इशारा दिला.
Uddhav Thackeray 1
Uddhav Thackeray 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणूस, मराठी कामगार, भूखंड विक्रीवरून महायुती सरकारवर चांगलेच धारेवर धरले.

"आताच्या खोके सरकारने मुंबई विकायला काढलीय. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याची सुपारी घेतलीय. खासगीकरणाचा घाट घातला जातोय. बघुया कुणाला एवढी खाज आली आहे, ती! 1966 चा काळ जर पुन्हा उभा करायचा ठरवला, तर त्यात चुकीचं काय?" असा ठाकरीशैलीत उद्धव यांनी महायुती सरकारला इशारा दिला.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित 'आरसीएफ' कर्चमारी संघटनेच्या कार्यालयात उद्घाटन झालं. मुंबईतले मोक्याचे भूखंड अदानी-लोढा यांनाच होत असलेल्या विक्रीवर, मुंबईतील मराठी माणसांच्या अवहेलनावर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला इशारा दिला. मुंबईला हद्दपार करण्याची सुपारी सरकारने घेतली आहे. नव्याने संकटं उभी राहू लागलीत. खोके सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार कसा होईल, हेच हे सरकार पाहात आहे. खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. बघुया कुणाला एवढी खाज आली आहे, ती! असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठी माणसांच्या लढ्यासाठी सदैव मैदानात असल्याचे म्हटले.

Uddhav Thackeray 1
Ashish Shelar Vs Shiv Sena Thackeray Party : मुख्‍यमंत्री पद अन् ठाकरेंचं 'तारे जमी पर'; आशिष शेलारांनी टायमिंग साधलं...

मुंबई संपवायाची, तिच्या वैशिष्ट्यांवर घाला घालायचा, मराठी माणसाला बेकार करायचं, नोकरीच्या जाहिरातीत देखील मुंबईत मराठी माणसाला नो-एन्ट्री, इमारतींच्या काही भागात देखील मराठी माणसाला नो-एन्ट्री, 1966 चा काळ जर पुन्हा उभा करायचा ठरवला, तर त्यात चुकीचं काय? आम्ही हिंदुंच (Hindu) रक्षण केले म्हणून मुंबईत सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत. एवढं करून देखील मीठाचा खडा का टाकता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray 1
Ambadas Danve : नवाब मलिक कोणासोबत, आता स्पष्ट झालं; दानवेंनी टायमिंग साधत शिंदे-फडणवीसांना डिवचलं

खतं मोदींनी तयार केले का?

''आरसीएफ' कर्चमारी संघटना देशाची अन्नदाता आहे. त्यांना तुम्ही खतं देता, त्या खतावर मोदींचा फोटो, लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो, लस त्यांनीच निर्माण केली, असा आमचा उपमुख्यमंत्र्यांचा सूर, खताचं काय, खत कोणी तयार केलं?' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. वांद्रे इथली जागा मुख्यमंत्री असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवली होती. पण आता काय निर्णय झाला,ते माहीत नाही. 'आरसीएफ' सुद्धा अदानीच्या घशात घालणार का? नाहीतर वांद्रे रेक्लमेशनला सरकारी कर्मचाऱ्यांना घरे द्या, आम्ही पाठिंबा देतो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

मराठी माणूस मीठागरात...

उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार मुंबईतील भूखंडाबाबत घेत असलेल्या निर्णयावर हल्ला चढवला. ''बीकेसी'चा मोक्याचा भूखंड बुलेट ट्रेनला देऊन टाकला. ज्याची गरज नव्हती, ते आमच्या माथी मारले. मराठी माणूस मीठागरात फेकून देणार का? धारावीच्या जास्तीत जास्त लोकांना अपात्र ठरवून मीठागर, दहिसर, मुलुंडला फेकून द्यायचे. मोक्याचे भूखंड अदानी आणि लोढाच्या घशात घालायचे, हे कारस्थान होऊ देणार नाही', असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

गद्दारांना 50 खोके अन् बहिणीसाठी...

गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये, हे तत्त्व योग्य नाही. गद्दारांना भरभरून द्यायचे. सरकारची ही योजना फक्त निवडून देण्यासाठी लाच आहे. पुन्हा निवडून आल्यावर हे बेघर करणार. हे होऊ न देण्यासाठी आमदार, नगरसेवक निवडून देण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com