उद्धव ठाकरे पुन्हा 'वर्षा'ची पायरी चढणार नाहीत...

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडला.
Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली होती. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला सोडला असून 'मातोश्री' या आपल्या खासगी निवासस्थानाकडे ते आपल्या परिवारसह निघाले आहे. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

Uddhav Thackeray Latest News
एकनाथ शिंदे नारायण राणे होतील : शिवसेना नेत्याने आधीच सांगितले होते...

मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'वर्षा' बंगला सोडला असून ते यापुढील निर्णय 'मातोश्री'वरून घेणार आहेत. ठाकरे एका कार मधून तर दुसऱ्या कारमधून आदित्य ठाकरे बाहेर पडले आहेत. त्याच्याबरोबर रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेही यावेळी तिसऱ्या गाडीतून बाहेर पडले आहेत. यापुढे ठाकरे पुन्हा वर्षाची पायरी चढणार नाहीत अशीही चर्चाही रंगत आहे.

ठाकरे वर्षा बंगल्या बाहेर पडतांना अत्यंत भावूक वातावरण झालं असून उद्धव ठाकरे हम तुम्हारे साथ है... अश्या घोषणाचे बॅनर घेऊन हजारो शिवसैनिक रस्त्यात उभे असून ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत. दरम्यान शिवसेना ही आमदार, खासदरांची नाही तर शिवसैनिकांची आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी दिली आहे.

Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde ठाम : शिवसैनिक भरडला गेलाय... महाविकास आघाडी सोडायलाच हवी!

आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलतांना ठाकरे म्हणाले की, ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, अशी बातमी पसरवली गेली. २०१४ ला एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आले ते पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची, पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने मिळवले. '२०१४ नंतर मंत्रिपदं उपभोगलीत, ती बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेमुळे मिळाली, हे मात्र लक्षात राहू द्या, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Latest News
४ वेळचे आमदार आणि २ वेळचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही एकनाथ शिंदेंचे पाय धरले

ते म्हणाले, हो मला धक्का बसला, दुःख झालं. सकाळी कमलनाथ आणि शरद पवारांचा (Sharad Pawar) फोन आला. त्यांनी सांगितले आम्ही तुमच्या सोबत आहेत. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी पद सोडायला तयार. आज मी वर्षावरील मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला. तसेच शिवसेनेचा दुसरा कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे, असेही ते म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com