Manohar Joshi Uddhav Thackeray
Manohar Joshi Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray Meet Manohar Joshi : उद्धव ठाकरे पोहचले मनोहर जोशी यांच्या भेटीला!

Uddhav Thackeray Meet Manohar Joshi : आजही आपण ठाकरे गटासोबत ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे.
Published on

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Uddhav Thackeray Meet Manohar Joshi ) यांची भेटी घेतली आहे. मनोहर जोशी यांच्या वाढदिवसाचं निमित्त ठाकरेंनी भेच घेतली. मनोहर जोशी यांनी कालच स्पष्ट केल होते की, मी आधीपासूनच शिवसेनेत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेहमीच उभा आहे. त्यामुळे ते ठाकरे गटातच राहणार आहे. यानंतर ठाकरेंच्या या भेटीची चर्चा होत आहे.

मनोहर जोशी यांनी ठाकरे गटाबाबतची आपली भूमिका जाहीर केल्यानंतर आता उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray त्यांच्या भेटीसाठी पोहचले. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या पाठीशी जोशी कायमच खंबीरपणे उभे राहिले आहेत. मनोहर जोशी आजही ठाकरे गटासोबत ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे.

Manohar Joshi Uddhav Thackeray
Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात करणार समृद्धी आणि मेट्रोचे लोकार्पण, फडणवीसांनी घेतला आढावा...

काही दिवसांपूर्वी मनोहर जोशी यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतली होती. यामुळे त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाबाबत चर्चा होत होती. पण आता ही चर्चा संपुष्टात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनोहर जोशी यांना डावलल्याची चर्चा होत होती. मध्यंतरी शिवसेनेच्या एका जाहीर कार्यक्रमात तर उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांना सभा सोडून जावं लागलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com