Mumbai : अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रण मिळल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मात्र येवढा मोठा सोहळा आयोजित करताना इतिहासाचा दाखला देत राष्ट्रपतींना आमंत्रण नसल्याच्या कारणावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले. 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे दर्शनासाठी जाणार आहेत. तेथील कार्यक्रमासाठी ठाकरेंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले आहे.
22 तारखेला अयोध्येत जो कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं गेलं आहे की नाही हे माहित नाही .परंतु आम्ही त्यांना आमंत्रण देत आहोत, असे ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबीर ठेवले आहे आणि त्यानंतर संध्याकाळी जाहीर सभा देखील होणार आहे.
22 जानेवारीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते हे नाशिक इथल्या काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार असून 23 तारखेला ते जाहीर सभा देखील नाशिक मध्ये घेणार आहेत. या संपूर्ण त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण दिले आहे. त्यांचे खासदार रीतसर हे आमंत्रण देतील, असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने शिवसेनेचे शिबिर हे नाशिकला होणार आहे. गोदातीरी महाआरती देखील केली जाणार आहे. शिवसैनिकांकडून 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा नाशिक मध्ये साजरा केला जाणार आहे. केवळ या कारणासाठी अयोध्येला जात नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या सगळ्यात राजकीय रंग नको. हा सोहळा खूप महत्त्वाचा आहे आणि यात कुठलंही राजकारण आणायला नको.ज्यावेळेला आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेऊ, असे देखील ठाकरे यांनी सांगितले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.