Uddhav-Raj Thackeray Defeated : मोठी बातमी! पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधुंचा दारुण पराभव, 'बेस्ट'मध्ये भोपळाही फुटला नाही!

BEST Credit Society Election Result : दी बेस्ट एम्प्लाॅईज को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपली 9 वर्षांची सत्ता गमावली आहे
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shashank Rao Panel Win : बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंना पहिल्याच निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. 21 जागांवर उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. तर, आमदार प्रसाद लाड यांच्या महायुती प्रणित समृद्धी पॅनलला अवघ्या 7 जागा मिळाल्या आहे. तर, सर्वाधिक जागा जिंकत शशांक राव यांच्या पॅनलने सत्ता मिळवली आहे. शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या आहेत.

सोमवारी 'बेस्ट' पतपेढीसाठी निवडणुकी झाली. या निवडणुकीत तब्बल 83 टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची कामगार सेना आणि राज ठाकरेंची मनसे यांची पहिल्यांदाच या निवडणुकीसाठी युती झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे बंधू चमत्कार घडवणार अशा चर्चा होत्या. मात्र, शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता मिळवली तर, ठाकरे बंधुंच्या पॅनलला भोपळा देखील फोडता आला नाही.

सोमवारी मतदान झाल्यानंतर मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र, पावसामुळे निवडणूक अधिकारी दुपारी आले. त्यानंतर मजमोजणी सुरू झाली. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती आणि बुधवारी पहाटे निकाल जाहीर करण्यात आला.

एकुण 35 केंद्रावर ही निवडणूक पार पडली. तर, तब्बल 150 उमेदवार रिंगणार होते. दरम्यान मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या पहिल्याच निवडणुकीत झालेला पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेला मोठा धक्का मानला जातोय.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Mahayuti Government: मुख्यमंत्र्यांनी दिली नागपूरकरांना गुड न्यूज, नवे नागपूर विकसित करणार

ठाकरेंनी 9 वर्षांची सत्ता गमावली

बेस्ट पतपेढीवर मागील नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेची सत्ता होती. यंदा त्यांनी मनसेसोबत युती केल्याने त्यांना फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, त्यांच्या विरोधात शशांक राव यांचे पॅनेल तसेच प्रसाद लाड, नितेश राणे, प्रवीण दरेकर यांचे महायुतीचे सहकार समृद्धी पॅनल होते. या तिरंगी लढतीमध्ये दारुण ठाकरे बंधूंच्या पॅनलला दारुण पराभव स्वीकारावा लागला.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : मुंबईत मोनोरेलमध्ये घडलेल्या थरारानंतर सरकारची धावपळ! मुख्यमंत्र्यांनीही उचलले मोठे पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com