Mahayuti Government: मुख्यमंत्र्यांनी दिली नागपूरकरांना गुड न्यूज, नवे नागपूर विकसित करणार

Nagpur News : राज्य मंत्रिमंडळाकडून या प्रकल्पाच्या मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतरच शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे. या नव्या नागपूरमुळे रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होणार आहे.
Mahayuti government
Mahayuti governmentSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना आनंदाची वार्ता दिली. नागपूर शहराचा झपाट्याने होणारा विस्तार बघून हिंगणा परिसरात आता नवीन नागपूर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन नागपूरकडे नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ‘तिसऱ्या रिंगरोड’ला मंगळवारी (ता.19) राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी प्रदान केली आहे. हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर महानगर विकास प्राधिकरण संस्था (एनएमआरडीए)च्या माध्यमातून विकसित केले जाणार आहे. याची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे.

मुंबई येथे राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या मंगळवारी अनेक प्रकल्पांबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. यामध्ये नागपुरातील या दोन्हा महत्त्वाच्या प्रकल्पांना ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे.

सुमारे 500 कोटीहून अधिक किमतीचे हे दोन्हा प्रकल्प असल्याने त्याला राज्य मंत्रिमंडळ (कॅबिनेट)ची मंजुरी आवश्‍यक आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या दोन्ही प्रकल्पाच्या मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची चिन्हे आहेत.

मिहान प्रकल्प आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राजवळ नवीन नागपूर (Nagpur) विकसित करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याकरिता 1700 एकर जागा अधिग्रहित केली जाणार आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) किंवा गुडगाव येथील व्यावसायिक, आर्थिक केंद्राप्रमाणेच ‘नवीन नागपूर’ची रचना केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Mahayuti government
BJP Vs Rahul Gandhi: भाजपचं एकच ट्विट; बिहारमध्ये राहुल गांधी अन् तेजस्वी यादव यांच्या आरोपांचा 'तो' बॉम्ब ठरला फुसका बार

राज्य मंत्रिमंडळाकडून या प्रकल्पाच्या मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतरच शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे. या नव्या नागपूरमुळे रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामध्ये येण्यासाठी शासनस्तरावर देश-विदेशातील कॉर्पोरेट कंपन्या/ऑफिसेस यांना आकर्षित करण्यात येणार आहे. हजारे कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प 15 वर्षांचा असून, तो तीन टप्प्यामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईतील बीकेसी हे राज्यासह देशातील एक प्रमुख केंद्रीय व्यापार जिल्हा (सेंट्रल बिजनेस डिस्ट्रीक) आहे. त्याच धर्तीवर नवीन नागपूरही व्यापाराचे केंद्र म्हणून उदयास यावे, असे प्रयत्न चालविण्यात येत आहे. वर्धा मार्गावरील मिहान, समृद्धी एक्सप्रेसवे आणि बुटीबोरी औद्योगिक परिसराच्या शेजारी असलेल्या हिंगणा तालुक्यातील मौजा गोधणी (रिठी) आणि मौजा लाडगाव (रिठी) या ठिकाणी सुमारे 1710.11 एकरवर नवीन नागपूर प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी एनएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे.

Mahayuti government
Online Gaming Bill News: मोठी बातमी: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'ऑनलाइन गेमिंग'चे नियमन करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी

नागपूरमधील पहिला आणि दुसरा रिंगरोड रिंगरोड आता शहराचा भाग झाला आहे. या दोन्ही मार्गावर दिवसभर वर्दळ असते. रिंगरोडवर वाढती वाहनाची गर्दी लक्षात घेत भविष्यातील 50-60 वर्षांचा विचार करून तिसऱ्या रिंगरोडची निर्मिती होणार आहे. यासाठी 36 गावांतील सुमारे 880 हेक्टर आर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे.

याही प्रकल्पाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प एनएमआरडीएच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. प्रस्तावित तिसरा रिंग रोडची रुंदी सुमारे 120 मीटर तर लांबी 75 कि.मी. राहणार असल्याचे सांगण्यात येते. तो जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय-राज्य महामार्गावर जाण्यासाठी एक चांगला आणि सोयीचा पर्याय ठरणार असल्याचे बोलल्या जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com