Uddhav Thackeray News : पंतप्रधानपदाचा प्रश्न, ठाकरेंची मिश्किल टिप्पणी ; ' मी जातो उद्या शपथ घेतो...'

India Aghadi News : भाजपच्या विरोधात मुंबईत विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे.
Uddhav Thackeray, Sharad Pawar News
Uddhav Thackeray, Sharad Pawar NewsSarkarnama

Mumbai News : भाजपच्या विरोधात मुंबईत विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक होणार आहे. या आघाडीचे संयोजन कोण होणार तसेच पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान होतील, असे काही नेते म्हणतात, असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले, 'मी जातो उद्या शपथ घेतो' ठाकरेंच्या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Sharad Pawar News
Chhagan Bhujbal On Nashik Bank : अडचणीतील नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी भुजबळांचा मोलाचा सल्ला; म्हणाले...

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, 'हे सरकार गॅसवर असल्याचे सांगत लवकर जाणार आहे, असे सूचित केले. 'गॅसवर असल्यानेच गॅस सिलिंडरच्या किमती काहीशा कमी केल्याचे सांगत त्यांनी टोला लगावला. तसेच आम्ही देशातील सगळ्या महिलांना सुरक्षीत वाटेल, असे सरकार स्थापन करणार करू, असे सांगितले.

Uddhav Thackeray, Sharad Pawar News
Arvind Kejariwal News : 'इंडिया' आघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 'हे' तीन चेहरे ? केजरीवालांची तडकाफडकी माघार...

केंद्र सरकारला आणि भाजपला (BjP) मागील नऊ वर्षात रक्षाबंधन झाले नाही का ? तेव्हा भावाला बहिनींची आठवण आली नाही का, असा सवाल त्यांनी केला. आम्ही तानाशाही आणि जुमलेबाजीच्या विरोधात आहोत. आता केंद्रातील सरकार गॅसवर असल्याचेही ते म्हणाले. आमच्या बैठकीमुळे विरोधकांनी 'एनडीए'ची बैठक बोलावली असेल. विकास महत्त्वाचा आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे स्वातंत्र आहे. इंग्रजही विकास करत होते. आता भारत मातेच्या हातापायात बेड्या घालू देणार नाही. आम्ही कुणालाही हुकुमशाहा होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com