Uddhav Thackeray : लोकसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही ठाकरेंचा करिष्मा कायम; मुंबईतील दोन्हीही जागा जिंकल्या...

MLC Election 2024 Results Update : मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्हीही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. या विजयाने उद्धव ठाकरेंची मुंबईमधील ताकद वाढली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. 26 जून रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर मुंबई व कोकण पदवीधर आणि मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाचे चित्र सोमवारी (ता. 1 जुलै) स्पष्ट झाले आहे.

यात मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्हीही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. या विजयाने उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मुंबईमधील ताकद वाढली आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपची सरशी झाली आहे. अद्याप नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला नसला तरी तिथे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे दुसऱ्या फेरीच्या मतांच्या अधिकृत आकडेवारीने आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात काय घडलं ...?

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली.मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते.या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली.

जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ॲड.अनिल परब हे 44 हजार 784 मतं मिळवून विजयी झाले.तर पराभूत झालेल्या भाजपच्या किरण शेलार यांना 18 हजार 772 मतं मिळाली.

Uddhav Thackeray
CM Siddaramaiah : सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपद सोडणार? ; कर्नाटकतील राजकीय गोटात चर्चांना उधाण!

कोकणची जागा डावखरेंनी राखली...

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे हे 1 लाख 719 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या रमेश श्रीधर कीर यांचा पराभव केला.त्यांना 28 हजार 585 मतं मिळाली. विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता.2) नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली.

मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते.त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला.

पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांनी जाहीर केले.

Uddhav Thackeray
Kolhapur Politics Analysis : विधानसभेला मैत्रिपूर्ण लढत भाजपला घातक; कोल्हापुरच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय?

ज. मो. अभ्यंकर विजयी...

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली.मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते.या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते.त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली.जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

बाराव्या फेरीअखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांनी जाहीर केले.

नाशिकमध्ये शिंदेंचा ठाकरेंना दे धक्का...?

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीत शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे पहिल्या स्थानावर होते.अपक्ष विवेक कोल्हे दुसऱ्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर होते.हे चित्र दुसऱ्या फेरीत पूर्णतः बदलल्याचे बोलले जाते.

दुसऱ्या फेरी अखेर आमदार दराडे यांना 24 हजार 239, विवेक कोल्हे यांना 15 हजार 564 आणि शिवसेना ठाकरे गटाचे श्री गुळवे यांना 15 हजार 133 मते मिळाली आहेत.त्यानुसार आमदार दराडे 8 हजार 408 मतांनी आघाडीवर आहेत.

Uddhav Thackeray
Kolhapur News : कौल दिसला अन् राधानगरीतले नेते फिरले; मेहुण्याच्या राजकारणात पाहुणे आडवे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com