ठाकरेंचा फडणविसांना टोला : तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विधानसभेत खणखणीत भाषण
CM Uddhav Thackeray Criticise Devendra Fadnavis
CM Uddhav Thackeray Criticise Devendra Fadnavis sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत आज भाजपच्या आरोपांनी उत्तर दिले. त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांनी लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस यांना सीबीआय किंवा राॅ सारख्या संस्थेत कामाला घ्यावे, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना काय उत्तर देणार, असे मला ही मंडळी विचारतात. बाळासाहेबांनी त्यांना (मोदींना) वाचवलं? यावर बाळासाहेबांना काय उत्तर देणार? मी 2014 मध्ये हिंदू होतो आणि आजही आहे. ज्या शिवसैनिकांनी 1992 च्या वेळी मुंबई वाचवली. त्याला छळू नका. तुमचा सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असतां तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता. मी तुमचा पट्टा गळ्यात बांधला असता तर माझ्या कुटुंबीयांवर टाच आली नसती. हे नीच, निंदनीय आणि विकृत आहे. वैयक्तिक दृष्ट्या टार्गेट केलं जातं आहे. यातून नंतर काही सिद्ध होत नाही. माध्यमांनी पण बातम्या दाखवताना तारतम्य दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.

CM Uddhav Thackeray Criticise Devendra Fadnavis
अत्यवस्थ वडिलांना दिलेल्या शब्दाला फडणवीस जागले! सदाभाऊंनी सांगितली आठवण

मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा. शिखंडीसारखे वार का करत आहात? माझ्या कुटुंबावर कारवाई केली म्हणून मी घाबरलेलो नाही. पण हे खेळ थांबवा. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

तुम्ही चालवलेले या कारवाया कोणी बघत नाही, असे समजू नका. हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे. या अशा वाटेला जाऊ नका. कोणाचेच भलं होणार नाही. मी घाबरलो म्हणून हे सांगत नाही. सत्तेवर आल्यानंतर लोकांना काय देणार आहोत, हे महत्वाचे आहे. मिळालेल्या संधीचे सोने करायचे की माती, हे आपण ठरवायला हवे.

CM Uddhav Thackeray Criticise Devendra Fadnavis
Uddhav Thackeray : हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका.. माझ्या शिवसैनिकाला छळू नका!

देवेंद्र फडणवीस यांनी सारखे पेन ड्राईव्ह देण्याची गरज नाही. मी तुमच्यासोबत येतो. तुम्ही जे आता चाळे केलेले आहेत. माझ्या कुटुंबियांची बदनामी केली आहे. याच्यावर टाच, त्याच्यावर टाच असे सुरू आहे. टाका मला तुरुंगात. मी येतो तुमच्याबरोबर. मग फुरसतीने आरोप गोळा करा. खुलासे करून कुठे ऐेकले जात नाही. याचे शेपूट त्याला. त्याचे शेपूट याला, असे सुरू आहे. एवढाच तुमचा जीव जळत असेल तर मी तुरुंगात जायला तयार आहे. कृष्णाला जेथे ठेवले त्या तुरुंगात मला ठेवा, असे आव्हान त्यांनी दिले. आज अनिल देशमुखला आत टाकणार, उद्या मलिकला आत टाकणार, असे हे सांगत फिरतात. हे या यंत्रणांचे दलाल आहेत का, असा सवाल ठाकरे यांनी विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com