Mumbai : उद्धव ठाकरेंना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण मिळाले की नाही, यावर चर्चा होत आहेत. निमंत्रण मिळाले नसले तरी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही, यावरून भाजप त्यांना टार्गेट करत आहे. मात्र, अयोध्येला जाणार की नाही, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
राम मंदिर कोणत्या पक्षाची प्राॅपर्टी नाही. याआधी मी अयोध्येत गेलो होतो. आतादेखील रामलल्लाच्या दर्शनाला जाईल. मला कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावेळी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
मी अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनाला जाईल. मंदिरात दर्शन घेईल. पण दर्शन घेतल्यानंतर पुढे काय? घरी आल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या घरात खाण्यास काही नसेल तर त्याचे काय करायचे, असे म्हणत ठाकरे यांनी देशातील समस्यांकडे लक्ष देण्याचे सुचवले.
असंख्य ज्योती एकत्र येतात त्यावेळी मशाल बनते आणि मशाल कोणाच्याही सत्ता असू तिला जाळून खाक करू शकते. तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढत आहात. सरकारला जाहिराती करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच कोरोनात तुम्ही काम केले, असे म्हणत अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले.
नरेंद्र मोदींना टार्गेट करताना देशभरातील रेल्वे स्टेशनवर नरेंद्र मोदी यांचा सेल्फी पाॅइंट उभारण्यात येत आहे. या एका सेल्फी पाॅइंटसाठी साडेसहा लाख रुपये खर्च होणार आहे. एका सेल्फी पाॅइंटला येवढा खर्च करताय, मग अंगणवाडी सेविकांना पैसे का नाही देत, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.