Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा आजपासून दिल्ली दौरा; जागा वाटपाबाबत चर्चा?

Uddhav Thackeray will visit Delhi Assembly Elections:लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाता आहे, त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ठाकरे ये 'इंडिया' (I.N.D.I.A.)च्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मलिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेणार आहेत.महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची आज ते भेट घेणार आहेत.

तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाता आहे, त्यामुळे या भेटीला विशेष महत्व आहे.

त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

Uddhav Thackeray
Nandurbar News: विरोधक-सत्ताधारी भिडले; झेडपीच्या सभेत माईक खेचला!

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार आहेत. उद्धव ठाकरे आज दिल्लीतील मराठी मीडियाशी संवाद साधणार असून 7 ऑगस्टला राष्ट्रीय मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com