Uddhav Thackeray : शिवसेना हातची निसटल्यानंतर ठाकरेंनी उचलले मोठे पाऊल : आगामी रणनीतीबाबत मातोश्रीवर खलबतं

शिवसेना आणि धनुष्यबाण गमाविल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेरजेच्या राजकारणास सुरुवात केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण गमाविल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बेरजेच्या राजकारणास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात लढण्यासाठी त्यांनी छोट्या पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच मुंबईच्या (Mumbai) काही पॉकेट्‌समध्ये आपली ताकद राखून असलेल्या पक्षांशी आज खुद्द ठाकरेंनी चर्चा केली. त्यात समाजवादी (SP), आम आदमी (AAP) आणि आजाद समाज पक्ष आदी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी मातोश्रीवर खलबलं झाली. राज्याची सत्ता आणि पक्षही हातचा गेल्यानंतर मुंबई महापालिकेची सत्ता कायम राखण्यासाठी ठाकरे यांनी निवडणूक रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. (Uddhav Thackeray's discussion with leaders of 'SP', 'AAP')

पक्ष आक्षि चिन्ह गेल्यानंतर शिंदे गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन दोन हात करण्याचा ठाकरे यांचा इरादा आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्याने महापालिका निवडणुकांना लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याची शक्यता वर्तविण्यात यत आहे.

Uddhav Thackeray
Thackeray-Shinde CM Post :उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंचे नाव सुचविले होते : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांना न्यायालयीन लढाईसोबतच राजकीय मैदानातही करिष्मा दाखवावा लागणार आहे. त्याच हेतूने पारंपरिक विरोधक असलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर पाचारण केले होते. त्याच वेळी मुंबईच्या काही भागांत विस्तार करण्याच्या तयारीत असलेल्या ‘आप’ च्या नेत्यांनाही ठाकरे यांनी साद घातली. ठाकरे यांनी आप आणि सपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्या, आजाद समाज पक्षाचे कैलास जैसस्वार, आपचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम हे ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित होते. या पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची ठाकरे यांची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray
Shinde Vs Thackeray : शिंदे गट आणखी एक नवा डाव टाकण्याच्या तयारीत; ठाकरेंच्या उत्तराकडे असणार महाराष्ट्राचे लक्ष

दरम्यान, आप आणि सपा नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही भाजप नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टीकेची संधी सोडली नाही. ठाकरे, सपा, आपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर नव्या चर्चेना तोंड फुटले आहे. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे जयस्वार यांनी या वेळी सांगितले. याशिवाय, रमेश दुबे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतीय नेत्यांची सभाही ठाकरे यांनी आज घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com