Maharashtra Politics: '' पराभवाचे हादरे बसू लागले की,भाजपा त्यांचा हुकमी खेळ..!''; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Thackeray Vs Bjp : हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत 'हिंदू खतरे में' म्हणण्याची हिंदूंवर वेळ...
Modi Government, Uddhav Thackeray
Modi Government, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Group On Bjp : उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदी सरकार व शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असतो. कधी सभा, कधी पत्रकार परिषदा तर कधी सामनाच्या अग्रलेखाचा वापर य़ा टोकेसाठी केला जातो. या टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत असते. आता पुन्हा एकदा मुंबईतील जनआक्रोश मोर्चावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

गेल्या आठ वर्षापासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. याआधीच्या काळात 'इस्लाम खतरे में है' असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्वावादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत 'हिंदू खतरे में' असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे.

मात्र, पराभवाचे हादरे बसू लागले की, भाजपा त्यांचा हुकमी खेळ सुरू करत असतो. आताही त्यांनी हिंदू मुसलमान खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक खतऱ्यात आला असून धर्मांतरविरोधी कायदा, 'लव्ह जिहाद' अशा मुद्द्यांवर भाजप व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' काढला अशी घणाघाती टीका ठाकरे गटानं भाजप (Bjp)सह शिंदे गटावर केली आहे.

Modi Government, Uddhav Thackeray
Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघांसाठी आज मतदान; भाजपसह आघाडीची प्रतिष्ठापणाला

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षापासून केंद्रात मोदी-शहांचे ( Narendra Modi - Amit Shah) रामराज्यच चालले आहे व हे राज्य हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा आक्रोश मोर्चा निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. याआधीच्या काळात 'इस्लाम खतरे में है' असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्वावादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत 'हिंदू खतरे में' असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे अशी बोचरी टीकाही ठाकरे गटाकडून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.

याचवेळी शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल अशी ग्वाही सुध्दा दिली आहे.

Modi Government, Uddhav Thackeray
Samajwadi Party : भाजपचं टेन्शन वाढलं ; सपाचं ‘ओबीसी कार्ड’, अखिलेश यांचा नवा प्लॅन !, 'ब्राह्मण-ठाकुरांना...'

..की भाजपाशासित राज्यांत हिंदू खतऱ्यात येण्याची हालचाल सुरू होते!

निवडणुकीचे बिगुल वाजले की भाजपाशासित राज्यांत अचानक हिंदू खतऱ्यात येण्याची हालचाल सुरू होते. गुजरात, उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांत हिंदुत्व खतऱ्यात येत असेल तर त्या राजवटीतच दोष आहेत. 'हिंदू जन आक्रोश' हा प्रकार फक्त निवडणुका किंवा राजकीय फायद्यासाठीच असेल तर ती हिंदुत्वाशी बेइमानी ठरेल. धर्मांतराचा मुद्दा गंभीर आहे. आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. पण त्याबाबत राजकारण करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे.

सकल हिंदूंसाठी शिवसेना हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान...

मोदी सरकारने (Modi Government) प्रजासत्ताक दिनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. हिंदू कारसेवकांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश मुलायम यांनीच दिले होते. त्यांचा राष्ट्रीय गौरव केल्यानेच हिंदू जन आक्रोश उसळला व शिवसेना भवनासमोर जमा झाला असंही अग्रलेखात म्हटलं आहे. मोर्चातील सगळ्यांचे शिवसेनेवर 'लव्ह' आहे आणि दिल्लीतील ढोंगी हिंदू सरकारविरुद्ध 'जिहाद' आहे, असाही टोला लगावण्यात आला आहे.

मात्र, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल असं आश्वासनही सामनातून ठाकरे गटानं दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com