Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Murder Case : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सी. सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन आणि उज्ज्वल निकम यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यासह देशातील महत्त्वाचे खटले लढविणारे अॅड. उज्ज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतून राजकारणात एन्ट्री घेतली. भाजपने त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतवलं होतं. मात्र, त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता.
त्यामुळे लोकसभेला परावभाचा सामना करणाऱ्या निकम यांची आता थेट राज्यसभेवर वर्णी लागल्याचं दिसत आहे. निकम यांची राज्यसभेवर नियुक्त झाल्याल्यापासून अनेकांच्या मनात एकच प्रश्न येत आहे. तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, आता ते खासदार झाल्यामुळे ते हा खटला लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच आता खुद्द निमक यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यामुळे मी आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करु शकतो की नाही याबाबतचा अभ्यास करेन.
तसंच मी काही विशेष कायदेतज्ज्ञांसोबत या संदर्भात बोलेन." त्यांच्या या वक्तव्यामुळे आता ते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. शिवाय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी निकम हेच या प्रकरणातील वकील असावे अशी मागणी केली होती. त्यामुळे आता निमक यांच्या भूमिकेकडे देशमुख कुटुंबियांचं देखील लक्ष लागलं आहे.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेल्या उज्वल निकम यांची देशभरातली अनेक महत्वाचे आणि गाजलेले खटले लढवले आहेत. 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यामुळे सरकारी वकील म्हणून त्यांची कारकीर्द देशभरात चर्चेत होती. सुरूवातीला महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणून त्यांनी काम केलं.
1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार मर्डर केस, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित हत्याकांड, 2008 मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, प्रमोद महाजन हत्या, कोपर्डी बलात्कार प्रकरण असे महत्वाचे खटले त्यांनी हाताळले आहेत. याच महत्वपूर्ण कामगिरीबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.