Chhota Rajan : छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा! , 'या' प्रकरणात तब्बल दोन दशकानंतर आला कोर्टाचा निर्णय!

Chhota Rajan sentenced to life imprisonment : महाराष्ट्र सरकारच्या नोटिफिकेशननंतर छोटा राजनच्या सर्व 71 प्रकरणांचा तपास सीबीआय़ला सोपवला आहे.
Chhota Rajan
Chhota RajanSarkarnama

Underworld don Chhota Rajan : मुंबईतील एका विशेष न्यायालयाने 2001मध्ये हॉटेल व्यावसायिक जय शेट्टीच्या हत्येच्या गुन्ह्यात गँगस्टर छोटा राजनला गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत प्रकरणाचे विशेष न्यायाधीश एएम पाटील यांनी राजनला हत्येसाठी भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार दोषी ठरवलं आहे.

जय शेट्टी मध्य मुंबईच्या गामदेवी येथे गोल्डन क्राउन हॉटेलचे मालक होते. छोटा राजन गँगकडून जबरदस्ती वसूलीच्या धमक्यांना सामोरे जात असलेल्याजय शेट्टीला छोटा राजन गँगच्या दोन शुटर्सनी 4 मे 2001 रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गोळी मारली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर हत्येचा गुन्हा नोंदवला होता. पुढे तपासातून असे समजले की शेट्टीला छोटा राजन(Chhota Rajan) गँगचा सदस्य हेमंत पुजारीकडून खंडणीसाठी फोन आला होता आणि पैसे न दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली.

Chhota Rajan
Ajay Bhosale News : गोळीबाराचा मास्टरमाइंड अगरवालच, छोटा राजनच्या शूटर्सनं झाडल्या अजय भोसलेंवर गोळ्या

राजन विरोधात जबरदस्ती वसुली आणि संबंधित गुन्ह्यांसाठी अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळेच हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी त्याच्याविरोधात आणि अन्य आरोपींविरोधात मकोका अंतर्गतही आरोप नोंदवण्यात आले. मागील दोन विविध खटल्यांमध्ये हत्येच्या प्रकरणात तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यापैकी एकाला पुराव्यांअभावी सोडण्यात आलं होतं. राजन 2011मध्ये पत्रकार जेडे यांच्या हत्येप्रकरणी आधीपासूनच जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे आणि सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद आहे.

Chhota Rajan
तिहारमध्ये कडेकोट बंदोबस्तात असलेला छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील 'एम्स'मध्ये दाखल

आता हॉटेल व्यावसायिक हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच 16 लाख रुपयांचा दंड देखील ठोठवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नोटिफिकेशननंतर छोटा राजनच्या सर्व 71 प्रकरणांचा तपास सीबीआय़ला सोपवला आहे. सीबीआयने याआधी पत्रकार जेडे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास करत होती. याशिवाय छोटा राजनच्या तीन अन्य प्रकरणांचा तपासही सीबीआयने केला, ज्यामध्ये तो दोषी आढळलेला आहे. याप्रकरणांमध्ये त्याला दहा वर्षे, आठ वर्षे आणि दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com